Lakshya Hylo Winner : लक्ष्य सेनने रचला इतिहास! जोनाथन ख्रिस्तीचा २१-१७, २१-१० असा धुव्वा उडवत पटकावले हायलो ओपनचे जेतेपद
Lakshya Hylo Winner : हायलो ओपनच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनने जोनाथन क्रिस्टीचा २१-१७, २१-१० असा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील सातवे विजेतेपद पटकावले. या हंगामातील हे त्याचे पहिले विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०२१ मध्ये हायलो ओपनचे विजेतेपद जिंकले होते.

Lakshya Sen Clinches Hylo Open Title 2026 Defeating Jonatan Christie : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने अखेर चालू हंगामातील जेतेपदाचा प्रदीर्घ दुष्काळ संपवला आहे. रविवारी झालेल्या हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने इंडोनेशियाच्या अव्वल खेळाडू जोनाथन ख्रिस्ती याचा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या ख्रिस्तीला लक्ष्यने २१-१७, २१-१० अशा फरकाने पराभूत करत मानाचे जेतेपद पटकावले. लक्ष्यच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सातवे आणि या स्पर्धेतील दुसरे जेतेपद ठरले आहे.
दोन वेळा हायलो ओपन जिंकणारा पहिलाच भारतीय –
या ऐतिहासिक विजयासह लक्ष्य सेनने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. दोनदा हायलो ओपन स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू बनला आहे. यापूर्वी त्याने २०२१ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. चालू हंगामात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर लक्ष्यला आठ स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता; त्यामुळे हे यश त्याच्यासाठी मोठे दिलासादायक ठरले आहे.
पहिल्या गेममध्ये चुरस, दुसऱ्या गेममध्ये एकतर्फी वर्चस्व
LAKSHYA SEN WINS THE HYLO OPEN TITLE BY DEFEATING WORLD NO.6 IN FINALS! 🥇
– Finally, BWF Tour tittle for him this year!
So much happy for him!!!!!!!!! 🥹🥹🥹 https://t.co/NUEvOZVnpL
— The Khel India (@TheKhelIndia) November 1, 2026
अंतिम लढतीच्या पहिल्या गेममध्ये लक्ष्यने १८-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, ख्रिस्तीने सलग गुण मिळवत स्कोअर १७-१८ असा जवळ आणला. मोक्याच्या क्षणी संयम राखत लक्ष्यने पहिला गेम २१-१७ असा खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय शटलरने कोणतीही ढिलाई दाखवली नाही. वेगवान स्मॅश, नेटवरील चपळ हालचाली आणि अचूक प्लेसमेंटच्या जोरावर त्याने ख्रिस्तीवर पूर्ण वर्चस्व राखत दुसरा गेम २१-१० ने जिंकून ट्रॉफी उंचावली.
सिंधूपाठोपाठ लक्ष्यचाही डंका; भारताचा दुहेरी धमाका
INDIA RULES THE HYLO OPEN! 🇮🇳🔥
PV Sindhu in women’s singles. Lakshya Sen in men’s singles. Two trophies coming home! 🏆
#PVSindhu #LakshyaSen https://t.co/hlhCx874Et
— FanCode (@FanCode) November 2, 2026
उपांत्य फेरीत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हला नमवून अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या लक्ष्यने याआधी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले होते. विशेष म्हणजे याच स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद भारताच्या पीव्ही सिंधूने पटकावले होते. त्यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेननेही बाजी मारल्याने भारताने हायलो ओपनमध्ये दुहेरी सुवर्णमुद्रा कोरत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर तिरंगा फडकवला आहे.





