‘लाडकी बहीण’ योजनेची मोठी अपडेट समोर ; ऑगस्टमध्ये फॉर्म भरणाऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana । राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी लाखो महिलांनी फॉर्म भरले होते. त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले आहेत. मात्र आता ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना कधी पैसे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर आता सरकारकडून देण्यात आले आहे. आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात येणार 3 हजार रुपये? Ladki Bahin Yojana ।
सरकारी योजना ‘लाडकी बहीण योजने’चा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे Ladki Bahin Yojana ।
ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते.
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती एप मधून अर्ज दाखल करुन घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र, राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत, असे आदेश दिले होते.
हेही वाचा
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा ‘जयदीप आपटे’ नेमका कोण?





