Shivaji Maharaj statue collapsed । सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्यावर किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्यापुतळा सोमवारी दुपारी कोसला. उभा दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट कोसळली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधला जात आहे.
या घटनेनंतर आता पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदार जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कारवाई करण्याची मागणी केली होती. हा पुतळा उभारण्याचे काम राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवले जाते. अशीही माहिती सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद करत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. अशात आता जयदीप आपटे कोण आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
दरम्यान, लहानपणापासून कलाक्षेत्राची आवड असल्याने जयदीप आपटेने आठवीत असतानाच या क्षेत्रात जाण्याचे ठरवले होते. कल्याणमधील त्यांच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्याचा प्रभाव जयदीपवर शालेय दशेपासूनच होता. मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करायचे. जयदीपचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदविका व नंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला.
जयदीप आपटे हा २५ वर्षांचा तरुणानेच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २ ८ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारला आहे. २ ८ फूट उंच हा पुतळा उभारण्यासाठी साधारण ३ वर्षांचा कालावधी लागतो. पण हा पुतळा जून २ ० २ ३ मध्ये बनविण्यास सुरुवात केली. अवघा सात महिन्यामध्ये हा पुतळा तयार करण्यात आला. अशी माहिती जयदीप आपटेकडून सनातन दैनिक या वृत्तपत्राला काही महिन्यांपूर्वी देण्यात आली होती.
त्याने मुलाखतीत पुतळा विषयी केलेले विधान चर्चेतही आले होते. ‘जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल…’ असेही आपटे म्हणाला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारू शकतो कि नाही अशी भीतीही त्याने व्यक्त केली होती. मुलाखतीत त्याने सांगितले होते,’या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला. संधी मोठी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही.’
त्याने पुढे सांगितले, हा ३५ फुटी उंच पुतळा उभा करताना जयदीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते. पुतळ्याला विलंब होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. ‘सहा फुटांचे मॉडेल पूर्ण झाल्यावर ते थ्रीडी स्कॅन केले गेले. स्कॅन केल्यावर खरे तर मॉडेल सीएनसी तंत्राने फोममध्ये कोरायचे ठरले होते; पण काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्रीडी प्रिंट करण्याचे ठरवले. मित्रांनी अक्षरशः एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम सुरू झाले व पुढे पुतळा उभा झाला’ असेही त्याने सांगितले.
‘कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय, या कामाच्या आधी 3 – 4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती ‘एखादा पुतळा तयार करणार का?’, अशी. भारतीय नौदल काम करून घेणार. त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार; म्हणून मग मीच ठरवले की, काम करायचे. एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान नमुने (मॉडेल) बनवले. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले, असे जयदीप आपटेने मुलाखतीत सांगितले होते.