Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर कुणाल कामराने भाजपच्या ‘या’ महिला नेत्यावर साधला निशाणा

मुंबई : काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडिनय कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. हे प्रकरण ताजे असताना कुणाल कामराने (Kunal Kamra) आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.
पोस्ट केला नवा व्हिडिओ
इन्स्टाग्रामवर त्याने नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो निर्मला सीतारमण यांच्यावरील विडंबनात्मक कविता वाचून दाखवताना दिसत आहे. मंगळवारी त्याने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता कुणाल कामराने सीतारमण यांच्याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
काय आहे व्हिडिओमध्ये?
“आपका टॅक्स का पैसा हो रहा है हवाहवाई इन सडकों की बर्बादी, करने सरकार ये आयी मेट्रो है इनके मन मैं, खोद कर ये ले अंगडाई ट्रॅफिक बढाने ये है आयी, ब्रिजेस गिराने है ये आयी कहते है इसको तानाशाही”, अशी उपरोधिक कविता त्याने वाचून दाखवली आहे. यापुढे तो म्हणतो, “आणि काही फरक पडत नाही, तुमच्या आकांशा गेल्या कचऱ्याच्या डब्ब्यात.. कॉर्पोरेट कर्मचारी हा कॉर्पोरेटपेक्षा अधिक टॅक्स भरतो आणि हे सगळं देशहितासाठी होतंय.” सीतारमण यांच्यावरील कविता तो पुढे वाचून दाखवतो.
हे पण वाचा : Kunal Kamra : हम होंगे कंगाल एक दिन.. कॉमेडियन कुणाल कामराने शेअर केला नवा व्हिडिओ
“देश में इतनी महंगाई, सरकार के साथ है आयी लोगों की लुटने कमाई, साडीवाली दीदी आयी सॅलरी चुराने ये है आयी, मिडल क्लास दबाने ये है आयी पॉपकॉर्न खिलाने ये है याई कहते है इसको निर्मला ताई” निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधत तो (Kunal Kamra) पुढे म्हणतो, ” त्या या देशाला हव्या असलेल्या जेएनयूच्या विद्यार्थिनी आहेत. हे घ्या भावा.. नेहरुंची चूक आहे. चुकीच्या विद्यापिठात त्यांनी शिक्षण घेतलंय. बनारस विद्यापिठात शिकल्या असत्या तर चांगल्या अर्थमंत्री बनल्या असत्या.”





