‘खरं बोललं की सख्ख्या आईलाही राग येतो…’; एकनाथ शिंदेंना कुणी डिवचलं, पाहा….

Kunal Kamra | कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदेंवर केलेल्या टिप्पणीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली. या प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत.
View this post on Instagram
‘कामरा याने माफी मागितली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचा काम केलं हे चुकीचं आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर आपण माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी टोकाला जाणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अश्यातच आता उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्या मराठीत एक म्हण आहे खरे बोले की सख्ख्या आईला पण राग येतो…, हाच राग कोरटकर, सोलापूरकर बाबतीत का काढला नाही…” असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.





