IND vs WI : कुलदीप यादवचा जलवा कायम! मोहम्मद सिराजला मागे टाकत पटकावला अव्वल क्रमांक

कुलदीपने सिराजला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान –
या दमदार कामगिरीनंतर कुलदीप 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मागे टाकत पहिले स्थान पटकावले, तर सिराज आता दुसऱ्या स्थानावर आहे. 2025 मध्ये कुलदीप यादवने आपल्या सातत्यपूर्ण गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
Trapped in front 👌
Kuldeep Yadav gets his first wicket of the innings 👍#TeamIndia have their 5⃣th wicket!
Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank | @imkuldeep18 pic.twitter.com/eatif4YwJa
— BCCI (@BCCI) October 13, 2025
त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 18 डावांत 38 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने 15 डावांत 37 विकेट्स घेत दुसरे स्थान मिळवले आहे. त्यांच्यानंतर वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा क्रमांक लागतो. या सर्व गोलंदाजांनी भारतीय संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
हेही वाचा – Cricketer Died : धक्कादायक! सामना जिंकला पण जीव गमावला; विजयाचा जल्लोष करताना हृदयविकाराचा झटका, पाहा VIDEO
2025 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- 38 – कुलदीप यादव (18 डाव)
- 37 – मोहम्मद सिराज (15 डाव)
- 31 – वरुण चक्रवर्ती (15 डाव)
- 30 – जसप्रीत बुमराह (15 डाव)
- 26 – रवींद्र जडेजा (21 डाव)
तिन्ही फॉरमॅटमध्ये कुलदीपची प्रभावी कामगिरी –
कुलदीप यादवने यंदा प्रत्येक फॉरमॅटमध्ये प्रभावी गोलंदाजी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत दोन सामन्यांच्या चार डावांत 12 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सात सामन्यांत 9 विकेट्स मिळवल्या आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सात सामन्यांत 17 विकेट्स घेत फलंदाजांना त्रस्त केले आहे. याशिवाय, आयपीएल 2025 मध्येही त्याने 14 सामन्यांत 15 विकेट्स घेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. हे आकडे दर्शवतात की, कुलदीप सध्या आपल्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे आणि प्रत्येक फॉरमॅटमध्ये भारतासाठी सामनावीर ठरत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील शानदार प्रदर्शनानंतर आता कुलदीप यादवचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवण्याचे आहे. भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, त्यानंतर टी-20 सामने होणार आहेत. निवड समितीने कुलदीपला या मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे. आता अपेक्षा अशी आहे की, कुलदीप आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.





