Koyna Dam: कोयना धरणातून शनिवारी सकाळी पाणी विसर्ग वाढणार; नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
Updated On:

कोयनानगर (प्रतिनिधी) – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यामुळे शनिवारी उद्या दि. २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून ४०,००० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
तसेच आवक होईल त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक विसर्गासह कोयना नदीमध्ये उद्या एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक असेल.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणामध्ये आज दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजता एकूण ८२.०१ टीएमसी (७७.९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.





