Koynanagar News : कोयना पायथा वीजगृहातील अठरा मेगावॅटचे युनिट बंद? अनेक दिवसांपासून एकाच युनिटवर वीजनिर्मिती
Koynanagar News : कोयना धरणातील पाणीसाठा १०० टीएमसीचा टप्पा ओलांडून पूर्ण क्षमतेच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, कोयना पायथा वीजगृहातील वीजनिर्मितीबाबत एक चिंताजनक बाब समोर आली आहे.

Koynanagar News : कोयना धरणातील पाणीसाठा १०० टीएमसीचा टप्पा ओलांडून पूर्ण क्षमतेच्या दिशेने वाटचाल करीत असताना कोयना पायथा वीजगृहातील वीजनिर्मिती क्षमतेचा पूर्ण वापर होत आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. (Koynanagar News)
पायथा वीजगृहातील १८ मेगावॅट क्षमतेचे एक युनिट तांत्रिक बिघाडामुळे बंद असून, अनेक दिवसांपासून केवळ एका युनिटवर वीजनिर्मिती सुरू असल्याचे समजते. त्यामुळे महानिर्मिती कंपनीच्या देखभाल- दुरुस्ती व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Koynanagar News)
पायथा वीजगृहात १८ मेगावॅट क्षमतेची दोन युनिट असून एकूण स्थापित क्षमता ३६ मेगावॅट आहे. धरणातून पायथा वीजगृहासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी अधिकाधिक कार्यक्षम वापर होणे अपेक्षित आहे. (Koynanagar News)
मात्र, दोनपैकी एक युनिट बंद असल्यास उपलब्ध वीजनिर्मिती क्षमतेवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. कोयना धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवून उपलब्ध पाण्याचा ऊर्जानिर्मितीसाठी अधिकाधिक वापर करण्याची हीच योग्य वेळ आहे. (Koynanagar News)
मात्र, याच कालावधीत १८ मेगावॅट क्षमतेचे एक युनिट बंद असेल, तर उपलब्ध जलसंपत्तीचा अपेक्षित ऊर्जानिर्मितीसाठी वापर कितपत होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Koynanagar News)
एक युनिट बंद आहे. यंत्रणेतील एखादे युनिट दीर्घकाळ बंद राहणे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. युनिटमध्ये कोणता तांत्रिक बिघाड झाला आहे, दुरुस्तीचे काम सुरू आहे का आणि ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे, याची माहिती महानिर्मितीने स्पष्ट करणे आवश्यक आहे. (Koynanagar News)
या १८ मेगावॅटच्या युनिटच्या बंद काळात संभाव्य किती वीजनिर्मिती होऊ शकली असती, याचाही हिशोब महानिर्मितीने जनतेसमोर मांडावा. कोयना प्रकल्प हा राज्याच्या ऊर्जा व्यवस्थेतील महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प असल्याने त्यातील उपलब्ध क्षमतेचा पूर्ण आणि कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. (Koynanagar News)





