Koyananagar News : डोंगरकपार्यातील तरुणाची आयआयटीच्या शिखरावर झेप; कोयना परिसराची मान अभिमानाने उंचावली
मर्यादित साधनं, कठीण परिस्थिती आणि मोठी स्वप्नं या सगळ्यांच्या साक्षीने नवजा या दुर्गम डोंगररांगांनी (Koyananagar News) वेढलेल्या गावातून विवेक सपकाळ या तरुणाचा सुरु झालेला प्रवास आज आयआयटी जोधपूरपर्यंत पोहोचला आहे.

Koyananagar News : मर्यादित साधनं, कठीण परिस्थिती आणि मोठी स्वप्नं या सगळ्यांच्या साक्षीने नवजा या दुर्गम डोंगररांगांनी (Koyananagar News) वेढलेल्या गावातून विवेक सपकाळ या तरुणाचा सुरु झालेला प्रवास आज आयआयटी जोधपूरपर्यंत पोहोचला आहे. विवेकच्या या यशाने संपूर्ण कोयना परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे.
उपकार्यकारी अभियंते धोंडीराम सकपाळ (बंटी) यांचे चिरंजीव असलेल्या विवेकने आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲन्ड डाटा सायन्स या आधुनिक शाखेत पदवी संपादन (Koyananagar News) करत आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले. वडिलांच्या कष्टांचा, त्यागाचा आणि शिक्षणावरच्या अढळ विश्वासाचा हा परिपाकच ठरला आहे.
दुर्गम भागातील मर्यादा, साधनांची कमतरता, आणि प्रत्येक टप्प्यावर उभ्या ठाकलेल्या अडचणी या सगळ्यांवर मात करत विवेकने आपले ध्येय घट्ट पकडून ठेवले. प्रत्येक पावलागणिक त्याच्या डोळ्यांसमोर आई-वडिलांचे स्वप्न आणि स्वतःचे भविष्य होते. त्याच्या यशात केवळ गुणपत्रिकेतील आकडे नाहीत, तर त्या मागे लपलेला संघर्ष, जागवलेल्या रात्री आणि न सोडलेली आशा आहे.
कोयना विभागातून आयआयटीमध्ये यश मिळवणारा पहिलाच विद्यार्थी ठरल्याने हा क्षण परिसरासाठी भावनिक आणि अभिमानाचा ठरला आहे. विवेकचे हे यश केवळ त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही, ते संपूर्ण ग्रामीण भागासाठी आशेचा किरण ठरले आहे. आपणही करू शकतो हा विश्वास आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनात रुजत आहे. सकपाळ कुटुंबियांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






