RCB vs DC : ‘हे माझं मैदान…’, केएल राहुलच्या ‘कांतारा’ सेलिब्रेशनने वेधलं सर्वांच लक्ष, VIDEO व्हायरल

RCB vs DC KL Rahul’s Kantara celebration video viral : १० एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळवण्यात आला. या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुलने ९३ धावांची नाबाद खेळी केली आणि दिल्लीला ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामना जिंकल्यानंतर केएल राहुलने सामन्याच्या शेवटी केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामना जिंकल्यानंतर केएल राहुलचा सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल –
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ५८ धावांवर चार विकेट्स गमावूनही, केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सच्या डळमळीत डावाला सावरले आणि ९३ धावांची नाबाद खेळी साकारली, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट्सने सामना जिंकला. या शानदार खेळीनंतर, केएल राहुलने जमिनीवर एक वर्तुळ काढले आणि त्यामध्ये बॅट मारत म्हणाला की, हे माझे मैदान आहे. आता त्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Radha4565/status/1910510624351674480
मी येथे खेळत मोठा झालोय – केएल राहुल
The way he says 'This is mine' 🥹 pic.twitter.com/DKnWv2HcmN
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 11, 2025
दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये केएल राहुलने त्याच्या व्हायरल सेलिब्रेशनबद्दल खुलासा केला आहे. व्हिडीओमध्ये, केएल राहुलने विजयानंतरच्या सेलिब्रेशनबद्दल सांगितले आणि म्हटले की, “हे माझ्यासाठी एक खास ठिकाण आहे. सामना संपल्यानंतरचे सेलिब्रेशन माझ्या आवडत्या चित्रपट ‘कांतारा’ मधील आहे. हे सेलिब्रेशन सर्वांना आठवण करून देण्यासाठी आहे की, हे माझे स्वतःचे होमग्राउंड आहे. हे घर आहे, मी याला सर्वात जास्त ओळखतो. मी येथे खेळत मोठा झालो आहे.”
हेही वाचा – RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ सुसाट! आरसीबी धूळ चारत नोंदवला सलग चौथा विजय
विशेष म्हणजे या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकून ८ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान भक्कम केले आहे. त्यांच्या पुढे, गुजरात टायटन्स चांगल्या नेट रन रेटमुळे समान गुणांसह अव्वल स्थानावर आहे.





