KL Rahul Bowled : हरप्रीत ब्रारचा तो ‘मिस्ट्री बॉल’ अन् केएल राहुलचा उडाला मधला स्टंप! पाहा VIDEO
KL Rahul Bowled : हरप्रीत ब्रार याने आपल्या एका 'जादुई' चेंडूवर कर्नाटकचा स्टार फलंदाज केएल राहुलला चकवा देत क्लीन बोल्ड केले

KL Rahul Bowled Video Viral : रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामात सध्या पंजाब आणि कर्नाटक यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, ३० जानेवारी रोजी पंजाबचा फिरकीपटू हरप्रीत ब्रार याने आपल्या एका ‘जादुई’ चेंडूवर कर्नाटकचा स्टार फलंदाज केएल राहुलला चकवा देत क्लीन बोल्ड केले. ब्रारच्या या अप्रतिम चेंडूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
केएल राहुलचे झुंजार अर्धशतक –
कर्नाटकची सुरुवात अत्यंत भक्कम झाली होती. सलामीवीर मयंक अग्रवाल (४६ धावा) आणि केएल राहुल (KL Rahul )यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची शतकीय भागीदारी केली.
केएल राहुल चांगल्या लयीत दिसत होता, त्याने ८६ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. राहुल आपल्या अर्धशतकाचे रूपांतर शतकात करेल असे वाटत असतानाच हरप्रीत ब्रार त्याच्या मार्गात अडथळा ठरला.
कसा उडाला केएल राहुलचा स्टंप?
Cracking delivery 💥
Harpreet Brar bowls a beauty to get the big wicket of KL Rahul 🔥
A fine stroke-filled innings of 59 (87) from Rahul ends 👌
Scorecard ▶️ https://t.co/yY9bAnAsyv@IDFCFIRSTBank | #RanjiTrophy pic.twitter.com/oq2QiqYWic
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 30, 2026
हरप्रीत ब्रारने केएल राहुलचा त्रिफळा उडवला
कर्नाटकच्या डावातील २८ व्या षटकात हरप्रीत ब्रारने एक असा चेंडू टाकला, ज्याने राहुलला पूर्णपणे गोंधळात टाकले. हा चेंडू लेग स्टंपवर पडला आणि खेळपट्टीवरून वेगाने वळला. राहुलने चेंडू डिफेंड करण्यात प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे चुकला आणि चेंडू थेट मिडल स्टंपवर जाऊन आदळला. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या ब्रारने आपल्या घरच्या मैदानावर (मोहाली) दाखवलेली ही कमाल पाहून चाहते थक्क झाले आहेत.
केएल राहुलची विकेट घेतल्यावर हरप्रीत ब्रार इथेच थांबला नाही. त्याने देवदत्त पडिक्कल (९), केव्ही अनीश (३२) आणि रविचंद्रन स्मरन (९) यांनाही बाद करून कर्नाटकच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्नाटकने ६ बाद २५५ धावा केल्या होत्या. कर्नाटकचा संघ अजूनही ५४ धावांनी पिछाडीवर असून पंजाबने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
कर्नाटकवर पंजाबचे वर्चस्व –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने पहिल्या डावात ३०९ धावा केल्या होत्या. अभिजीत गर्ग (८१) आणि एमानजोत सिंह चहल (८३) यांच्या अर्धशतकांमुळे पंजाबने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.





