RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

RR vs PBKS Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs : आयपीएल २०२५ च्या पुनरागमनासह, पंजाब किंग्जने एका रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांच्या दमदार खेळीच्या जोरावर २१९ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्फोटक फलंदाज हरप्रीत ब्रारच्या फिरकीच्या जादूत अडकले आणि संघाला फक्त २०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह, पंजाब किंग्जचा सघ प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या राजस्थान रॉयल्सने या सामन्याची सुरुवात खूप चांगली केली आणि अवघ्या १९ चेंडूतच पंजाब किंग्जला अडचणीत आणले. तुषार देशपांडे आणि क्वेना म्फाका यांनी सलग ३ षटकांत पंजाबच्या टॉप-३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पण इतक्या चांगल्या सुरुवातीनंतरही, राजस्थानच्या गोलंदाजांना पंजाबला २१९ धावांचा मोठा स्कोअर करण्यापासून रोखता आले नाही. याचे कारण होते नेहल वढेरा आणि शशांक सिंग.
High-fives all around the @PunjabKingsIPL camp 🙌
With this win they move to the 2️⃣nd spot on the Points Table and one step closer to the Playoffs
Scorecard ▶ https://t.co/HTpvGew6ef #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/dZT4hw3f1Z
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
यशस्वी आणि वैभव यांची वादळी भागीदारी ठरली व्यर्थ –
Raised the temperature with 𝙨𝙘𝙤𝙧𝙘𝙝𝙞𝙣𝙜 𝙨𝙝𝙤𝙩𝙨 🌡
14-year old Vaibhav Suryavanshi departs after a breathtaking 40(15) 😎#RR notch up their highest powerplay score ever- 89/1
Updates ▶ https://t.co/HTpvGewE3N #TATAIPL | #RRvPBKS | @rajasthanroyals pic.twitter.com/Zu6muZJokz
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना, यशस्वी आणि वैभव यांनी राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी फक्त ४.५ षटकांत ७६ धावा जोडल्या. १५ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह ४० धावा काढल्यानंतर वैभव बाद झाला. त्याला हरप्रीत ब्रारने बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतरही यशस्वी थांबला नाही आणि त्याने २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, त्याने अर्धशतक ठोकल्यानंतर लगेचच आपली विकेट गमावली आणि २५ चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा काढल्यानंतर तो बाद झाला.
हेही वाचा – RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक
हरप्रीत ब्रारने राजस्थानच्या फलंदाजांना घातली वेसन –
यशस्वी आणि वैभव यांनी संघाला जलद सुरुवात दिली होती. परंतु हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर राजस्थानची लय बिघडली आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट गमावल्या. संजू सॅमसन २० धावा काढून बाद झाला आणि रियान पराग १३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेलने गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आणि अर्धशतक झळकावले, परंतु मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजीमुळे राजस्थानचा आवश्यक नेट रन रेट वाढला, ज्यामुळे फलंदाजांवर दबाव वाढला.
हेही वाचा – RR vs PBKS : कर्णधार असावा तर असा! दुखापतीनंतरही श्रेयसने पंजाबसाठी साकारली महत्त्वपूर्ण भागीदारी
राजस्थानला शेवटच्या षटकात २२ धावांची होती गरज –
𝘽𝙄𝙂 𝙒𝙄𝘾𝙆𝙀𝙏 ☝
Marco Jansen with the decisive blow to #RR ❤
Dhruv Jurel fought well with 53(31)
Scorecard ▶ https://t.co/HTpvGew6ef #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/Ob6XIBtX5j
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
राजस्थानला शेवटच्या षटकात २२ धावांची आवश्यकता होती पण मार्को यान्सेनने प्रथम जुरेलला बाद केले. जुरेल ३१ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह ५३ धावा करुन बाद झाला. पुढच्याच चेंडूवर त्याने हसरंगाला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यान्सेनला हॅटट्रिक घेण्याची संधी होती पण त्याने ती हुकवली. राजस्थानकडून क्वेना म्फाकाने दोन चेंडूत आठ धावा केल्या आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात आलेला शुभम दुबे सात धावा करून नाबाद परतला. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने तीन, तर यान्सेन आणि अझमतुल्लाह उमरझाईने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.





