IND v ENG : ‘आम्ही फक्त गप्प खेळून घरी जाऊ का…’, केएल राहुल अंपायरवर इतका का संतापला? पाहा VIDEO

IND v ENG KL Angry on Umpire : ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी शानदार पुनरागमन केले. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत इंग्लंडची दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत २१५/७ अशी बिकट अवस्था केली. यादरम्यान जो रुट आणि प्रसिध कृष्णा यांच्यात वाद झाला. हा वाद सोडवताना केएल राहुल अंपायरवर चांगला संतापला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जो रूट आणि प्रसिध कृष्णा यांच्यात जुंपली –
सामन्यातील २२व्या षटकात प्रसिध कृष्णा आणि जो रूट यांच्यात मैदानावर शाब्दिक चकमक झाली. प्रसिधच्या एका अप्रतिम चेंडूवर जो रूट अडचणीत सापडला आणि बाद होण्यापासून केवळ थोडक्यात बचावला. यानंतर प्रसिधने रूटच्या जवळ जाऊन त्याला काहीतरी बोलून चिथावणी दिली. या गोष्टीचा रूटला राग आला आणि त्यानेही पुढे येत प्रसिधला खडसावलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रूटने आक्रमक चौकार ठोकला आणि पुन्हा प्रसिधकडे पाहत काहीतरी बोलला. यावेळी दोघांमधील वाद आणखी पेटला.
केएल राहुल अंपायरवर संतापला –
KL Rahul to Dharmasena:
“What do you want us to do, keep quiet?
“What do you want us to do, bat bowl and go home?”KL Rahul came to save Prasidh Krishnapic.twitter.com/a6la9HvZB5
— Farrago Abdullah Parody (@abdullah_0mar) August 1, 2025
यावेळी रुट आणि प्रसिध यांच्या मध्यस्थी करायला आलेल्या केएल राहुल आणि अंपायर कुमार धर्मसेना यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. राहुल म्हणाला, “तुम्हाला आम्ही काय करावं असं वाटतं? फक्त फलंदाजी-गोलंदाजी करून घरी जावं?” यावर अंपायर धर्मसेना म्हणाले, “तुम्हाला गोलंदाज तुमच्याकडे चालत येणं आवडेल का? हे तुम्ही करू शकत नाही.” त्यांनी सामना संपल्यावर चर्चा करण्याचे सांगितले.
हेही वाचा – IND vs ENG कसोटीत नवा ट्विस्ट, रूट-प्रसिध भिडले! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
भारत पहिल्या डावात २२४ धावांत सर्वबाद झाला होता, तर इंग्लंडने १२९/१ अशी मजबूत सुरुवात केली होती. मात्र, कृष्णाने सत्राच्या शेवटच्या षटकात दोन विकेट घेत सामन्यात रंगत आणली. तसेच सिराजने १२ षटकांत ६६ धावा देत ३ विकेट घेतल्या, तर कृष्णाने ११.५ षटकांत ५१ धावा देत ३ विकेट मिळवल्या. इंग्लंडच्या सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी १३ षटकांत ९२ धावांची झंझावाती भागीदारी केली. मात्र, लंच ब्रेकनंतर दोन्ही सलामीवीर बाद झाले. इंग्लंडचा कर्णधार ओली पोप (२२) सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. आकाश दीपने डकेटला (४३) यष्ट्यांमागे झेलबाद केले,





