KL Rahul welcomes baby girl wife Athiya gives birth to 1st child : आयपीएल २०२५ ची सुरुवात दिल्ली कॅपिटल्स आणि टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांच्या घरात एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. केएल राहुलची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टीने सोमवार, २४ मार्च रोजी त्यांच्या मुलीला जन्म दिला. राहुल आणि अथिया यांना पहिल्यांदाच पालक होण्याचा आनंद मिळाला आहे. राहुल आणि अथियाने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून त्याचा पहिला सामना खेळणार होता, पण तो त्याच्या एक दिवस आधी घरी परतला. राहुलने दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाला सांगितले होते की त्याची पत्नी अथिया कधीही त्यांच्या बाळाला जन्म देऊ शकते, त्यानंतर फ्रँचायझीने राहुलला या खास प्रसंगी कुटुंबासोबत राहण्यासाठी घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
View this post on Instagram
सोमवार, २४ मार्च रोजी, जेव्हा दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सशी सामना करत होते, तेव्हा राहुल आणि अथियाने त्यांच्या मुलीच्या जन्माची बातमी एका फोटोसह शेअर केली. मात्र, राहुल आणि अथिया यांनी अद्याप त्यांच्या मुलीचे नाव उघड केलेले नाही. चाहत्यांव्यतिरिक्त, क्रिकेट आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध स्टार्सनीही या पोस्टवर दोघांनाही शुभेच्छा दिल्या. राहुल आणि अथिया यांचे लग्न २०२३ मध्ये झाले होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ते पालक होणार असल्याचे सांगितले होते.
काही महिन्यांपूर्वीच पालक होणार असल्याची दिली होती बातमी –
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच दोघांनीही इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो पोस्ट करून आनंद व्यक्त केला होता. एका फोटोमध्ये, अथिया सोफ्यावर सुंदरपणे बसली होती, तर केएल राहुल तिच्या मांडीवर डोके ठेवले होते. दुसऱ्या फोटोमध्ये ती पांढऱ्या टी-शर्ट आणि बटणे नसलेल्या डेनिम जीन्समध्ये होती आणि अभिमानाने तिचा बेबी बंप दाखवत आहे. सर्वात खास क्षण म्हणजे राहुलने अथियाच्या पोटावर हळूवारपणे हात ठेवला.