Ruturaj Gaikwad and Khalil Ahmed accused of ball tampering CSK vs MI : आयपीएल २०२५ चा तिसरा सामना रविवारी चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर पाडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ४ विकेट्सनी पराभव करत, आपल्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. त्याचबरोबर मुंबईला सलग १३ व्या वर्षी हंगामातील पहिला सामना गमावला. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांकडून दावा केला जात आहे की, कर्णधार ऋतुराज आणि खलील अहमदने चेंडूशी छेडछाड (बॉल टॅम्परिंग) केली होती.
ऋतुराज-खलीलचा व्हिडीओ व्हायरल –
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर, सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये, खलील अहमद त्याच्या खिशातून काहीतरी काढतो आणि गायकवाडला देतो. त्यानंतर गायकवाड ते खिशात ठेवतो. परंतु, दोन्ही खेळाडूंमध्ये काय देवाणघेवाण झाली. याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Were they doing ball tampering..? 😳
Khaleel gave something to Ruturaj and Ruturaj kept it in his pocket.. What were they hiding.. ? 🧐#IPL2025 #CSKvsMI pic.twitter.com/g1aeVOcuBM
— 𝙂𝙤𝙪𝙧𝙖𝙗🥷🇮🇳 (@gd_cric18) March 24, 2025
ऋतुराज आणि खलीलवर बॉल टॅम्परिंगचा आरोप?
Ball tampering in the first over of the match 🔥🔥🔥🔥🔥 https://t.co/9rgSQqLKtR
— Chaitanya Kumar🐎🦁 (@chay_kumar9) March 24, 2025
मात्र, सोशल मीडियावरील काही युजर्सनी या दोन्ही खेळाडूंवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. काहींनी या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केले आहेत की हे खरचं बॉल टॅम्परिंग आहे का? यावर एका युजर्सला असा विश्वास आहे की, हे बॉल टॅम्परिंग नाही.
Khaleel give his ring to ruturaj in first over first ball even ball was not even in handed what type of drama created by lockdown kids
— Gujarat Super Kings (@div_1213) March 24, 2025
त्याच्या मते खलीलने त्याची अंगठी गायकवाडला दिली होती. परंतु मुंबई इंडियन्स किंवा त्यांच्या कोणत्याही खेळाडूने याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.
सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. एमआयकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. सीएसकेने १५६ धावांचे लक्ष्य १९.१ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले. चेन्नईकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक नाबाद ६५ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सर्वात यशस्वी गोलंदाज विघ्नेश पुथूर होता, ज्याने ३ विकेट्स घेतल्या.