KKR vs CSK : डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या वादळी खेळीच्या जोरावर सीएसकेने मारली बाजी, केकेआरच्या वाढल्या अडचणी

KKR vs CSK Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 2 wickets : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या सीएसकेने अखेर केकेआरचा २ विकेट्सनी पराभव केला. यासह सीएसकेने आपला तिसरा विजय नोंदवला आणि केकेआरचा प्लेऑफचा मार्ग खडतर केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ६ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेने डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर ८ गडी गमावून १९.४ षटकात विजयावर शिक्कामोर्तब केला.
या पराभवामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या आशांना धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणेचा संघ १२ सामन्यांत सहा विजय आणि पाच पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात ११ गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट ०.१९३ आहे. दरम्यान, चेन्नईला सहा गुण मिळाले. हा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता केकेआरला उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकून इतर संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागले.
Capturing the moment in style 😎
A superb maiden #TATAIPL FIFTY for Dewald Brevis 👏
He’s putting on a show here in Kolkata.
Updates ▶ https://t.co/ydH0hsBFgS #TATAIPL | #KKRvCSK pic.twitter.com/5A4jRKYPLy
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2025
ब्रेव्हिसने साकारला धडाकेबाज खेळी –
६० धावांवर ५ विकेट्स गमावल्यानंतर अडचणीत सापडलेल्या चेन्नईच्या डावाला डेवाल्ड ब्रेव्हिसने आपल्या वादळी शैलीत तोंड दिले. वैभव अरोराच्या एका षटकात ब्रेव्हिसने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ३० धावा काढल्या. त्याने फक्त २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. २५ चेंडूत ५२ धावा करून ब्रेव्हिस बाद झाला. ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिस पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, शिवम दुबे एका टोकाला उभा राहिला आणि त्याने ४० चेंडूत ४५ धावा केल्या. शेवटच्या षटकात, एमएस धोनीने षटकार आणि अंशुल कंबोजने चौकार मारून चेन्नईचा विजय निश्चित केला.
हेही वाचा – KKR vs CSK : अजिंक्य रहाणेचा मोठा पराक्रम! रोहित-धोनीला मागे टाकत विराटच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री
रहाणे-रसेल यांनी साकारली उत्तम खेळी –
तत्पूर्वी ईडन गार्डन्स मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. गुरबाज फक्त ११ धावा करून बाद झाला. यानंतर, सुनील नारायण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. नरेनने १७ चेंडूत २६ धावा केल्या. त्याच वेळी, रहाणेने स्फोटक शैलीत फलंदाजी केली आणि ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. रहाणेने त्याच्या खेळीदरम्यान ४ चौकार आणि २ षटकार मारले.
हेही वाचा – Rohit Sharma Retirement : हिटमॅनचा कसोटीला अलविदा! ‘या’ ३ कारणांमुळे अचानक घ्यावी लागली निवृत्ती?
रघुवंशी बॅटने काही खास करू शकला नाही आणि फक्त एक धाव काढून बाद झाला. मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांनी शेवटच्या षटकांमध्ये जबाबदारी सांभाळली. रसेलने २१ चेंडूत ३८ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान, रसेलने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच वेळी, मनीषने २८ चेंडूत ३६ धावा केल्या, ज्यामुळे कोलकाता संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७९ धावा करू शकला.





