‘किरण राव’ची झाली शस्त्रक्रिया; फोटो शेअर करत डॅाक्टरांचे मानले आभार, नेमकं काय झालं होतं?

Updated On:
‘किरण राव’ची झाली शस्त्रक्रिया; फोटो शेअर करत डॅाक्टरांचे मानले आभार, नेमकं काय झालं होतं?

Kiran Rao : अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोशल मीडियावर याबद्दलची एक पोस्टही तिने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरणने स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स पोस्टद्वारे शेअर केले आहेत.

इंन्स्टाग्रामवरून किरने रावने तीन फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्या फोटोत सेल्फी पोस्ट केली आहे. दुसऱ्या फोटोत तिच्या हातातील हॅास्पिटल बँड दिसत आहे. अजून एका फोटोत ती बेडवर बसून सूप पिताना दिसत आहे. यासोबत एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये हॅास्पिटल बाहेरचा निसर्ग दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Rao (@raodyness)

किरणने कॅप्शमध्ये हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत चिंता व्यक्त केली होती. शस्त्रक्रियेनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

2024 मध्ये रिलीज झालेला किरण रावचा ‘लापता लेडीज‘ चित्रपट खूप गाजला. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचे कौतुक झाले. आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले होते. त्यानंतर दोघांनी आपल्या नात्याचा शेवट २००६ मध्ये केला. त्यानंतर आमिरने चित्रपट निर्माती किरण राव हिच्यासोबत लग्न केले. सुखी संसार केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Aamir Khan marriage : अभिनेता आमिर खानचं तिसरं लग्न ठरलं; होणाऱ्या पत्नीबाबत अन् लग्नाची तारीख जाणून घ्या...

2026-06-03 18:46:34

Aamir Khan marriage : अभिनेता आमिर खानचं तिसरं लग्न ठरलं; होणाऱ्या पत्नीबाबत अन् लग्नाची तारीख जाणून घ्या...

Aamir Khan: विमानप्रवासाआधी आमिर खानची खास सवय; ‘काही झालं तर…’ म्हणत लिहितो गुप्त चिठ्ठी

2026-05-01 12:33:10

Aamir Khan: विमानप्रवासाआधी आमिर खानची खास सवय; ‘काही झालं तर…’ म्हणत लिहितो गुप्त चिठ्ठी

Kiran Rao Health : किरण रावची तब्येत बिघडली; पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट

2026-02-18 12:21:32

Kiran Rao Health : किरण रावची तब्येत बिघडली; पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट

Faisal Khan press conference : शॅाकिंग! "आमिरला लग्नाशिवाय मुलं"; भावाचा सनसनाटी आरोप, कोण आहे ती?

2025-08-19 10:06:26

Faisal Khan press conference : शॅाकिंग! "आमिरला लग्नाशिवाय मुलं"; भावाचा सनसनाटी आरोप, कोण आहे ती?

आमिर खान 59 व्या वर्षी पुन्हा प्रेमात? रिना-किरणनंतर आता तिसऱ्या मुलीची एन्ट्री

2025-02-07 09:09:05

आमिर खान 59 व्या वर्षी पुन्हा प्रेमात? रिना-किरणनंतर आता तिसऱ्या मुलीची एन्ट्री