Temba Bavuma : ‘अनेकांना आमच्यावर शंका होती पण…’, विजेतेपदानंतर टेम्बा बावुमाने टीकाकारांची बोलती केली बंद

Temba Bavuma react on WTC Final 2025 Title : ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने हरवून आयसीसी ट्रॉफी जिंकली. या विजयासह त्यांची २७ वर्षांची आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा संपली. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मधील ऐतिहासिक विजयामुळे संघाच्या विश्वासार्हतेबद्दलच्या शंका दूर झाल्या आहेत. जेतेपदाच्या सामन्याच्या मार्गावर त्यांना कोणत्याही मजबूत प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागला नाही ही वस्तुस्थितीही त्यांनी नाकारली.
१९९८ मध्ये आयसीसी नॉक-आउट ट्रॉफी (आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्यानंतर हे त्यांचे पहिलेच डब्ल्यूटीसी जेतेपद आहे आणि त्यांची पहिलीच आयसीसी ट्रॉफी आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानवर मालिका विजय, न्यूझीलंडविरुद्ध पराभव आणि भारताविरुद्ध बरोबरी साधल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने २०२३-२५ चक्रात डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
डब्ल्यूटीसी फायनल जिंकल्यानंतर बावुमा काय म्हणाला?
TEMBA BAVUMA IS POWERFUL, THIS VIDEO IS POWERFUL 🥹
The El Capitano of South Africa. pic.twitter.com/WycOkKNbuz
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2025
सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात बावुमा म्हणाला, ‘आम्ही आमच्या कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचलो. आमच्या अंतिम फेरीत पोहोचण्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते, पण या विजयाने त्यांना उत्तर मिळाले. गेले दोन दिवस आमच्यासाठी खूप खास होते. आम्हाला असे वाटले की आम्ही दक्षिण आफ्रिकेतच खेळत आहोत. आम्ही कठोर तयारी केली आणि आम्ही खूप आत्मविश्वासाने आलो. अनेकांना आमच्यावर शंका होती पण आम्ही चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे.’
हेही वाचा – WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण; तब्बल १५ वर्षांनंतर फायनलमध्ये चारली धूळ
येथे मायदेशातील सामन्यासारखे वाटले –
टेम्बा बावुमाने आफ्रिकन संघ कमकुवत प्रतिस्पर्ध्यांचा सामना करून डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचला ही बाब खोडून काढली. तो म्हणाली, “आम्ही येथे असण्यास पात्र आहोत. लोकांनी म्हटलं की आम्ही मजबूत संघांचा सामना केला नाही, हे पूर्णपणे बकवास आहे. यावेळी आम्ही ऑस्ट्रेलियाला हरवलं, आम्हाला आमचं सर्वोत्तम प्रदर्शन करावं लागलं. मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही की मला कसे वाटत आहे. मी खूप आनंदी आहे, आम्ही चांगली योजना बनवली आणि कठोर परिश्रम केले. सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद, गेल्या चार दिवसांपासून येथे मायदेशातील सामन्यासारखे वाटले.”
हा विजय येणाऱ्या अनेक संस्मरणीय विजयांपैकी एक –
आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघात जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असूनही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात त्यांना संघर्ष करावा लागला आहे. संघ महत्त्वाच्या प्रसंगी दबाव हाताळण्यात अपयशी ठरला आणि विजेतेपदापासून दूर राहिला. बावुमालाआशा आहे की डब्ल्यूटीसी विजेतेपदामुळे हे सर्व बदलेल. तो म्हणाला, ‘आम्ही अविरत प्रयत्न करत आलो आहोत, सातत्याने विजयाच्या जवळ येऊनही घसरलो आहोत. यावेळी नशीबाने आम्हाला साथ दिली. आशा आहे की हा विजय येणाऱ्या अनेक संस्मरणीय विजयांपैकी एक असेल.’





