प्रभात वृत्तसेवा खालापूर – घरकाम करणाऱ्या महिलांना कोणतेही बोनस किंवा दिवाळी भत्ते मिळत नाहीत. तरीही त्या आपल्या मर्यादित उत्पन्नातून सण साजरे करतात. ही सामाजिक वास्तवता लक्षात घेऊन स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांच्या संकल्पनेतून, आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि कुलदीपक शेंडे यांच्या सहकार्यातून खोपोलीतील ६०० हून अधिक घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळी भेट म्हणून रवा, मैदा, साखर आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, राजू गायकवाड, मोहन अवसरमल, शिवसेना महिला आघाडी संघटक प्रिया जाधव, शिवसेनेचे दिनेश थोरवे, राहुल गायकवाड, अनिल मिंडे, गणेश खानविलकर, सचिन किरवे, डॉ. शेखर जांभले, डॉ. हेमंत पाटील, मुकेश रुपवते, रुपेश देशमुख, नाना मोरे, अमित फाले, कल्पेश लोवंशी, महिला आघाडीच्या मेघा वाडकर, सोनिया रुपवते, इंदू पाटील, जयश्री मिंडे तसेच स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष कांचन जाधव, उपाध्यक्ष शितल ढोकळे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.