Khokya Bhosle Update : सतीश भोसले उर्फ खोक्याची जेलमधून सुटका; बाहेर येताच म्हणाला…
वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अमानुष मारहाणीच्या व्हिडिओमुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या (Khokya Bhosle Update) याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Khokya Bhosle Update : वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अमानुष मारहाणीच्या व्हिडिओमुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या (Khokya Bhosle Update) याला मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील बहुचर्चित बॅटने मारहाण प्रकरण आणि ढाकणे कुटुंबीयांच्या मारहाण प्रकरणात बीड न्यायालयाने त्याची (Khokya Bhosle Update) निर्दोष सुटका केली आहे.
मागील वर्षभरापासून कारागृहात असलेल्या खोक्या याला (Khokya Bhosle Update) अखेर न्यायालयाकडून न्याय मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या राहत्या गावी शिरूर येथे समर्थकांनी जंगी स्वागत केले. सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना खोक्या याने भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
खोक्या म्हणाला, “आज सत्याचा विजय झाला. सत्य पराभूत होऊ शकते, पण पराजित होत नाही.” त्याने पुढे सांगितले की, “एक वर्ष मी जेलमध्ये होतो. राजकीय लोकांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला फसवण्याचा प्रयत्न केला. पण न्यायदेवतेने मला न्याय दिला. याबद्दल मी समाधानी आहे.”
हेलिकॉप्टर रील प्रकरणाचे स्पष्टीकरण
सोशल मीडियावर हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या खोक्या याने वडिलांच्या इच्छेचे स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “मी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये त्यांना घेऊन बसलो होतो. हेलिकॉप्टरमध्ये पटक्यात बसलेले माझे वडील कोणालाच दिसले नाहीत, फक्त मी दिसलो. वडिलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही तो मुलगा काय कामाचा?”
भाजप आमदार सुरेश धस यांचा आधार
खोक्या याने भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा उल्लेख करताना त्यांचे आभार मानले. तो म्हणाला, “सुरेश धस यांनी मला आधार दिला. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी आपले म्हणून आपुलकीने वागणूक दिली आणि माणुसकीच्या नात्याने शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या विरोधकांनी अण्णांना टार्गेट केले.”
मांस प्रकरणाबाबत बोलताना खोक्या याने दावा केला की, “माझ्या घरी जे मांस सापडले, ते माझे नव्हते. तुम्ही एक सांगा, जर एखाद्या माणसाने गुन्हा केला तर तो पुरावा घरात ठेवेल का? माझ्या घरात ते मांस कोणीतरी आणून टाकले होते.”
कुटुंबीयांवर झालेला अन्याय
या प्रकरणानंतर आपल्या कुटुंबीयांना मोठा अन्याय सहन करावा लागल्याचे खोक्या याने सांगितले. “या घटनेनंतर माझ्या कुटुंबावर अन्याय झाला. त्यांना घरातून बाहेर काढले, मारहाण झाली. माझे कुटुंब उघड्यावर पडले. माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई यात गेली. माझ्या कुटुंबाने काय भोगले असेल, माझी मुलं या परिस्थितीत कशी जगली असतील? याचा विचार करून मन सुन्न होते,” असे त्याने भावनिक आवाजात सांगितले.
सतीश भोसले उर्फ खोक्या (Khokya Bhosle Update) हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी असून, भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. बॅटने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा झाली होती. नोटांची उधळण, महागड्या गाड्या आणि इतर घटनांमुळे तो चर्चेत राहिला होता.






