Khelo India Youth Games 2023(Tennis) : महाराष्ट्राच्या तनिष्क-काहीर जोडीची अंतिम फेरीत धडक…

चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तनिष्क जाधव आणि काहीर वारीक यांच्या जोडीने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना तामिळनाडूच्या कावीन कार्तिक आणि ए. सिवा गुरु यांच्या जोडीला ६-२, ६-४ असे एकतर्फी पराभूत करताना टेनिस स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
तनिष्क आणि काहीर यांनी सुरेख समन्वय राखताना जोरदार फोरहॅन्डच्या फटके मारताना पॉईंट्सची कमाई केली. दुसऱ्या उपांत्य फेरीत पंजाब आणि तामिळनाडू यांची लढत होवून, या लढतीचा विजेत्याचे आव्हान अंतिम फेरीत महाराष्ट्रासमोर असणार आहे.
Khelo India Youth Games 2023 : बॅडमिंटनच्या दुहेरीत महाराष्ट्र अंतिम फेरीत..
बॅडमिंटनच्या दुहेरीत महाराष्ट्र अंतिम फेरीत…
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अत्यंत अतितटीच्या लढतीत महाराष्ट्राच्या श्रावणी वाळेकर आणि तारिणी सूरी यांनी उत्तराखंडच्या गायत्री रावत व मान्सा रावत यांचे आव्हान २१-१८, १६-२१, २२-२० असे मोडून काढताना बॅडमिंटनच्या मुलींच्या गटातील दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.





