खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ : दिलीप मोहिते यांच्या प्रचार सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू असून राजगुरूनगर शहरात झालेल्या प्रचार रॅलीला मतदारांनी प्रचंड पाठींबा दिला आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय व सहयोगी पक्षाचे राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांची प्रचारफेरी राजगुरूनगर शहरात काढण्यात आली.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरु स्मृतीस्थळमधील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. शहरातील पाबळ रोड, चव्हाण मळा, राक्षेवाडी आनंदनगर, एसटी बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसर, पांडुरंग नगर, थिगळस्थळ, पडाळवाडी, राहुल चौक या ठिकणी प्रचाररॅली झाली.
या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, जिल्हा परिषद सदस्या मंगल चांभारे, शांताराम चव्हाण, आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश दुधवडे, भाजपचे गणेश सांडभोर, दीप्ती कुलकर्णी, राजगुरूनगर शहर अध्यक्ष सुभाष होले, विनायक घुमटकर, विलास कातोरे, रणजित गाडे, पपू टोपे, नवनाथ होले, सतीश राक्षे, मच्छिंद्र राक्षे, प्रदीप सांडभोर, सागर सातकर, रफिक मोमीन, इजाज तांबोळी, वैभव घुमटकर, विकास चव्हाण, मनीषा पवळे, सुनील वाळुंज, बाळासाहेब सांडभोर, दिनेश कड, सिद्धार्थ कांबळे, अमित घुमटकर, शुभम सोनवणे, स्नेहल राक्षे, सागर पाटोळे, पपू बनसोडे, विलास मांजरे, मित्रसेन डोंगरे, विकास वाळुंज, संग्राम सांडभोर, वैभव नाईकरे, संतोष भांगे, सोपान राक्षे, यांच्यासह भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आरपीआय चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
व्यापारी वर्गाकडून पाठिंबा –
शहरात महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये महिलांकडून औक्षण करण्यात आले. शनिवारी (दि.2) काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत महिला वर्गाकडून त्यांचे औक्षण करण्यात आले तर व्यापारी वर्गाकडून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. ठिकठिकाणी आमदार मोहिते पाटील यांचा शाल-श्रीफळ देत सन्मान करीत पाठींबा देण्यात आला. दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून राजगुरुनगर शहरात काढलेल्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मंदिर, दर्ग्यात घेतले दर्शन : पदयात्रेद्वारे मतदारांशी साधला संवाद
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय व इतर पक्षाच्या महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस, अजितपवार गट) तथा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राजगुरूनगर शहरातून शनिवारी (दि. 2) प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीची सुरूवात राजगुरुनगर शहरातील शनिमंदिरात श्री शनीदेव व श्री हनुमानाचे दर्शन करून झाली त्यानंतर दिलावर खान दर्ग्यात जाऊन कबरीचे दर्शन घेवून झाली.
या पदयात्रेत पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, दत्ता सांडभोर, दीप्ती कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण चौधरी, राजगुरूनगर शहर अध्यक्ष सुभाष होले, विनायक घुमटकर, युवक शहराध्यक्ष सागर सातकर, संध्या जाधव, मुस्लिम यंग फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष रफिक मोमीन, इजाज तांबोळी, वैभव घुमटकर, अड सुखदेव पानसरे, रणजित गाडे, पपू टोपे, हणमंत कड, बापू थिगळे, सुशील शिंगवी,किशोर ओसवाल, वैभव घुमटकर, व्यापारी संघटनेचे विजय भन्साळी, राम कडुसकर, मच्छिंद्र राक्षे, प्रदीप कासवा, प्रदीप सांडभोर, हेमलता टाकळकर, मनीषा पवळे, नानजीन शेख, मीनाक्षी भांगे, दिनेश कड,अस्लम शेख, संतोष भांगे, प्रतीक मोहिते पाटील.सिद्धार्थ कांबळे, अमित घुमटकर, शुभम सोनवणे, स्नेहल राक्षे, मयूर जगदाळे, विकास थिगळे, पपू बनसोडे, मित्रसेन सोंगारे, विक्रांत सांडभोर, विकास वाळुंज, संग्राम सांडभोर, वैभव नाईकरे यांच्यासह भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचाररॅलीत शहरातील व्यापारी नागरिक महिलांकडून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सन्मान करीत सत्कार करीत पाठिंबा दिला.
शहरातील कानाकोपर्यात प्रचार
आमदार मोहिते पाटील यांची प्रचारफेरी राजगुरूनगर शहरातील मारुती मंदिर, बाजार पेठ, खालची वेस, गढई मैदान, तेली आळी, मोमीन आळी, आनंदी आनंद मंगल कार्यालय, शिंपी आळी, जुन्नरकर दुकान खडके हॉस्पिटल, ब्राह्मण आळी, जैन स्थानक, आझाद चौक, कुंभार वाडा, नगर परिषद चौक, नेहरू चौक, चिमण्या गणपती, तहसील कार्यालय, जनावरांचा दवाखाना परिसर,अहिल्यादेवी चौक, पाण्याची टाकी, समता नगर, संगम गार्डन, भीमाशंकर कॉलनी, प्राईड सिटी, संगम क्लासिक, वृंदावन सोसायटी, अभिमानश्री सोसायटी, पाटील इस्टेट, एलआयसी ऑफिस, भांबुरे वखार, सातनळ, टेल्को कॉलनी. नं 2, टेल्को कॉ. नं 3, अलंकापुरी सोसायटी, वाळूज स्थळ, तिन्हेवाडी रोड, बच्चे पाटील कॉलनी या परिसरात झाली.





