Pune District :दिलीप मोहितेंवर शुभेच्छांचा वर्षाव

राजगुरूनगर : खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज (दि.29) रोजी त्याच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान येथील सिद्वेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक करून शुभेच्छा स्वीकारण्याची सुरुवात झाली. यासाठी खास व्यासपीठ तयार करण्यात आले होते. यासह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसनिमित्ताने येणार्या व्यक्तीकडून फुलांचे गुच्छ, फेटे, शाल आणि वस्तू ऐवजी गरीब, होतकरू शाळकरी मुलांसाठी वह्या देण्याचे डी. एम. मोहिते युथ सिंडिकेटच्या वतीने आवाहन केल्यानुसार अनेक मान्यवरांनी माजी आमदार मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने असंख्य वह्या भेट दिल्या. यावेळी माजी आमदार मोहिते यांच्या पत्नी सुरेखा मोहिते उपस्थित होत्या.
वाढदिवसानिमित्ताने जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिप माजी सदस्य मंगल चांभारे, खेड बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, कैलास लिंभोरे, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, शिक्षक संघटनेचे शांताराम चेहेरे, अविनाश सांडभोर, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच सहकारी सोसायटीचे चेअरमन संचालक, राजगुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास वर्कळ, युवक काँग्रेसचे सागर सातकर, मनोज आहेर, सिद्धार्थ कांबळे, शुभम सोनवणे, संतोष भांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा राक्षे, कैलास सांडभोर, सुभाष होले, वैभव घुमटकर, डॉ रोहिणी राक्षे, विनायक घुमटकर,अरुण चौधरी, शांताराम भोसले, जयसिंग दरेकर, मनोज खांडेभराड, उद्योजक भरत कानपिळे, डॉ. अविनाश अरगडे, लक्ष्मणराव टोपे, गणेश थिगळे,अजय चव्हाण, प्रदीप सांडभोर, संध्या जाधव, मनीषा पवळे यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते सहकारी संस्था ग्रामपंचातीचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
65 जणांचे रक्तदान
वाढदिवसानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला युवक युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला. 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.





