Kharadi Accident : खराडीत काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Kharadi Accident : धडक देऊन चालक फरार; फॉरेस्ट पार्क सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू.
Updated On:

Kharadi Accident – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडीतील फाॅरेस्ट पार्क परिसरात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम सुनील देवनाथ (२८, रा. केसनंद रस्ता,) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत गंगाधर गोविंद शिंदे (३२, रा. शिवरकर वस्ती, वाघोली) यांनी खराडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शुभम हा २८ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खराडीतील फाॅरेस्ट पार्क सोसायटी रस्त्याने निघाला असता, भरधाव वाहनाने दुचाकीस्वार शुभम याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शुभमला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिसांनी फाॅरेस्ट पार्क सोसायटी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक पोटे तपास करत आहेत.





