Murder Case : महाराष्ट्र हादरला..! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून, घटनेने खळबळ
Murder Case : चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्याच पत्नीवर बेसबॉल स्टीकने जीवघेणा हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घडली आहे.

Murder Case : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर बेसबॉलच्या स्टीकने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Murder Case)
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश डाबेराव याच्या घरातून मोठमोठ्याने आरडाओरड आणि वादाचा आवाज येत होता. हा आवाज ऐकून शेजारी राहणारे रोहन देवीदास घोडाम यांनी तातडीने डाबेराव यांच्या घराकडे धाव घेतली. (Murder Case)
घरात गेल्यानंतर गणेश डाबेराव हा पत्नी लक्ष्मी हिच्यासोबत वाद घालत असल्याचे दिसून आले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने तिच्यावर शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने घरातील बेसबॉलची स्टीक घेऊन लक्ष्मी यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. (Murder Case)
या हल्ल्यात लक्ष्मी डाबेराव गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (Murder Case)
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली. रोहन घोडाम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा हत्येचा गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (Murder Case)
चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे खामगाव शहरात खळबळ उडाली असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. (Murder Case)





