Khalapur News: राष्ट्रवादीला मोठा धक्का! खालापुरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते शिवसेनेत
Khalapur News: खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील उंबरविरा ठाकूरवाडीचे नागरिक, महिला व तरुण आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल.

Khalapur News – खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील उंबरविरा ठाकूरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष परशुराम सांबरी, बीडखुर्द ग्रामपंचायत सदस्या मालीबाई सांबरी, नामदेव हिंदोळा,
राजेश पारधी, राजू सांबरी, धर्मा भस्मा, शंकर हिंदोळा, पांडू चौधरी, वामन हिंदोळा, सुनील सांबरी, पप्पू सावंत, काशीनाथ सांबरी, गणपत खैर, राम ठोंबरे, हिरामण हिंदोळा, रवींद्र हिंदोळा, धर्मा सांबरी यांच्यासह ग्रामस्थ, महिला व तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. हा पक्षप्रवेश तालुकाप्रमुख प्रशांत खांडेकर, बीडखुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अजित देशमुख, ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा यादव व राजेंद्र चोरगे यांच्या पुढाकाराने झाला.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख शिवराम बदे, तालुकाप्रमुख प्रशांत खांडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, ज्येष्ठ नेते मनोहर थोरवे, विधानसभा अधिकारी रोहित विचारे, अंकुश दाभने, कर्जतचे माजी सभापती अमर मिसाळ, खालापूर पंचायत समिती सदस्य रितेश जाधव, प्रवक्ते सुरेश देशमुख, आदिवासी सेल विधानसभा प्रमुख गणेश केवारी, माजी उपसरपंच भरत पाटील, अजित पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा यादव,
राजेंद्र चोरगे, युवासेना संपर्कप्रमुख राकेश सुखदरे, मानकीवलीचे सरपंच बाळकृष्ण वाघमारे, मारुती गायकर, अनिकेत खांडेकर, बाळू भगत, बळीराम मांडवकर, शरद पाटील आदी उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गावातील समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊन गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.





