Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यासोबत या; राष्ट्रवादी विलनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : शरद पवार यांनी भाजपप्रणीत एनडीए (NDA) सोबत जाण्याच्या सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Sharad Pawar : मुंबईत सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख शरद पवार यांनी आपण एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासोबतच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अप्रत्यक्षरित्या संदेश दिला. (Sharad Pawar)
मध्यंतरी शरद पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करुन एनडीएत सामील होतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होईल, अशीही अफवा होती. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यामुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळाली. मात्र, शरद पवार यांनी या सर्व शक्यता पार धुडकावून लावल्या आहेत. (Sharad Pawar)
पवार म्हणाले, आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हो, चर्चा सुरू आहे. मला त्यांना सांगायचे आहे. आपण कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही. यायचे असेल तर आमच्यासोबत या, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी(शप) पक्ष राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीसोबत राहून काम करेल, हे स्पष्ट झाले आहे. (Sharad Pawar)
पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीतील चर्चेविषयीही माहिती दिली. आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितले आहे. (Sharad Pawar)
रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय देणे अपेक्षित आहे, त्याचे निवेदन दिले आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचे नाही, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु, असे पवार यांनी यावेळी म्हटले. (Sharad Pawar)
एआय समजून घेण्याचा सल्ला
महाराष्ट्र मधे एआय शिकवण्यासाठी पहिली संस्था बारामतीत स्थापन केली आहे. नुकताच त्या संस्थेत गेलो होतो, दारातून आत गेलो तेव्हा दोन रोबोटनी मला सॅल्यूट मारला. त्यांनी अनेक गोष्टी मला करून दाखवल्या. जगात अनेक प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता सोडवू शकेल. त्यामुळे ते शिकायला लागेल किमान आपण तो विषय समजून घ्यायला हवे. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले निवडणुक प्रक्रियेत काय होते आहे. (Sharad Pawar)
भविष्यात एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित साधणे निवडणुकीत वापरली जातील. त्यामुळे मी अध्यक्षांना याबाबत सांगितले आहे. आपल्यालादेखील याबाबत काहीतरी करावे लागेल. माझ सांगणे आहे की, याबाबत छापून येणारे लेख वाचा समजून घ्या. आपल्याला हे समजून घ्यायची मानसिकता करावी लागेल, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. (Sharad Pawar)






