Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणी दूषित; नगरसेवक अमोल बालवडकरांची महापालिकेकडे कारवाईची मागणी
Khadakwasla Dam : सांडपाणी प्रक्रिया केंद्र' (STP) उभारणे बंधनकारक करण्याची बालवडकरांची मागणी

Khadakwasla Dam : पुणेकरांची जीवन वाहिनी असलेल्या खडकवासला धरणातील पाणी दूषित होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे, यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी यासंदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
खडकवासला परिसरातील गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी, कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दूषित पाणी धरणाच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करणे काळाची गरज असून खडकवासला धरण परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी कुठून आणि कशा प्रकारे सोडले जाते, याची तपासणी करावी, अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.
बालवडकर यांनी मागणी केली आहे की, महापालिकेने या परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि व्यावसायिकांना ‘सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ (STP) उभारणे बंधनकारक करावे. तसेच स्थानिक ग्रामस्थांना दोष न देता, राज्य शासन किंवा महापालिकेने संबंधित ग्रामपंचायतींना STP उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून जलस्रोतांचे कायमस्वरूपी संरक्षण होईल आणि पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळेल.
पुणे महानगरपालिका प्रशासनाने या विषयाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता, सार्वजनिक आरोग्य आणि जलस्रोतांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न म्हणून पाहावे. खडकवासला धरणाचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस कृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा:





