IPL 2025 : आर्चर-बटलरसह इंग्लंडचे चार दिग्गज खेळाडू आयपीएलसाठी परतणार नाहीत, काय आहे कारण?

Key England Players to Miss IPL 2025 Restart : आयपीएल २०२५ च्या उर्वरित स्पर्धेला १७ मे पासून पुन्हा सुरूवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी सराव सुरू केला आहे. मात्र, असे अनेक खेळाडू आहेत, जे उर्वरित सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाहीत. यामध्ये इंग्लंडचे चार दिग्गज खेळाडू देखील आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, गुजरात टायटन्सचा फलंदाज जोस बटलर आणि सीएसकेच्या सॅम करन आणि जेमी ओव्हरटनचा समावेश आहे. हे खेळाडू आता उर्वरित सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाहीत.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात जोफ्रा आर्चरला राजस्थान रॉयल्सने १२ कोटी ५० लाखांना खरेदी केले. त्याने आतापर्यंत संघासाठी एकूण १२ सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स संघ आधीच आयपीएल प्लेऑफमधून बाहेर पडला आहे आणि आता त्यांचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, तो खेळायला येतो की नाही, संघाला फारसा फरक पडत नाही. त्याच वेळी, सॅम करनने सीएसकेसाठी पाच सामने आणि जेमी ओव्हरटनने तीन सामने खेळले.
जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे त्रस्त –
चेन्नई सुपर किंग्जही प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत, हे दोन खेळाडू खेळले नाहीत, तरी संघावर फारसा परिणाम होणार नाही. राजस्थान रॉयल्सच्या माहितीनुसार, जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही. संघ स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी, आर्चरला उर्वरित दोन सामने खेळायचे होते. मात्र, यावेळी त्याच्या तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जात आहे.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
जोस बटलरसह माघारी येणार नाही –
The Lankan 🦁 is now a Titan! ⚡#TitansFam, say hello to our latest addition, Kusal Mendis who will replace Jos Buttler from 26th May onwards! 🤩 pic.twitter.com/NxLFCQfsIx
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 15, 2025
खरंतर, इंग्लंड संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये बटलरला भाग घेण्यासाठी मायदेशी रहावे लागणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, गुजरात टायटन्सने प्लेऑफ सामन्यांसाठी बटलरच्या जागी श्रीलंकेचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे.





