Siya Goyal : सियाने केतनची हत्या का केली? चौकशीत हादरवणारं कारण समोर
Siya Goyal : पुण्यातील हायप्रोफाइल केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा (Ketan Agrawal Murder Case) तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अत्यंत धक्कादायक आणि मानवी नातेसंबंधांना काळिमा फासणारे खुलासे समोर येत आहेत.

Siya Goyal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात केतनशी लग्न नको असल्यामागील कारणे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रियकर चेतन चौधरी यानेच हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही दावा तिने केल्याचे वृत्त आहे. (Siya Goyal)
नेमकं काय घडलं?
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला होता. दोन्ही कुटुंबांमध्ये जुने व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध असल्यामुळे हा विवाह निश्चित करण्यात आला होता. मात्र, सियाचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध असल्याने तिला हे लग्न मान्य नव्हते. (Siya Goyal)
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सियाने तिच्या प्रेमसंबंधांबाबत कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, लग्नाचा निर्णय कायम राहिल्याने तिने आणि चेतनने केतनला मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. (Siya Goyal)
लोहगडावर कसा रचला कट?
तपासानुसार, १८ जून रोजी सियाने केतनला लोहगडावर फिरण्यासाठी नेले. सुरुवातीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दोघांनी एका कॅफेमध्ये बसून नव्याने योजना आखली. त्यानंतर पुन्हा योग्य संधी साधून केतनला खोल दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. (Siya Goyal)
घटनेनंतर सियाने हा अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, केतनच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर सिया आणि चेतन यांना अटक करण्यात आली. (Siya Goyal)
Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! सिया गोयलचा धक्कादायक खुलासा
चौकशीत सियाने काय सांगितलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सियाने केतनबद्दल वैयक्तिक नाराजी व्यक्त केली. “केतन तोतरे बोलत होता आणि तो विग (हेअर पॅच) वापरत असल्यामुळे मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते,” असे तिने सांगितल्याचे वृत्त आहे. (Siya Goyal)
यावर प्रतिक्रिया देताना केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी, “केतन हेअर पॅच वापरत होता, ही बाब आम्ही सियाच्या कुटुंबाला आधीच स्पष्टपणे सांगितली होती,” असे म्हटले आहे. (Siya Goyal)
याशिवाय, सियाने पोलिसांना दिलेल्या कथित जबाबात प्रियकर चेतन चौधरी यानेच तिला हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही दावा केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलिसांकडून सर्व पुरावे तपासले जात आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबींचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. (Siya Goyal)
Mumbai : मध्यरात्री पोलिस नियंत्रण कक्षात फोन वाजला अन्…; मुंबईत खळबळ






