Kerala Politics : केरळ मध्ये (Kerala Politics) भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही. इथे भाजपाची अथवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची पाटी कोरीच राहील. कर्नाटक आणि तेलंगणातील योजनांच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या युडीएफच्या नियोजित कल्याणकारी हमींना (Kerala Politics) आगामी निवडणुकांमध्ये राज्यात नक्कीच यश मिळेल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी केला आहे. K. C. Venugopal वेणुगोपाल म्हणाले की, काॅंग्रेसच्या पाच हमी अंतिम करण्यापूर्वी काँग्रेसने केरळच्या आर्थिक स्थितीचा सखोल अभ्यास केला होता. सर्व महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दरमहा १,००० रुपयांचे आर्थिक साहाय्य आगामी काळात दिले जाणार आहे. या योजनेत कुठलाही बदल नसल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित कल्याणकारी पॅकेजची माहिती देताना वेणुगोपाल म्हणाले की, या उपाययोजना सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक गरजांना योग्य प्रतिसाद देणाऱ्या आहेत. केरळमधील कष्टकरी महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रचंड ताण आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच,युडीएफच्या या प्रस्तावामध्ये वाहतूक साहाय्य, वाढीव निवृत्तीवेतन आणि आरोग्य विमा संरक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. केरळ (Kerala Politics) हे राज्य अनेकदा प्रगतिशील म्हणून ओळखले जात असले, तरीही येथील महिलांना मात्र तीव्र कष्टांचा सामना करावा लागत आहे.