SRH vs DC : विप्राजच्या ‘रनआऊट’वर काव्या मारन झाली भलतीच आक्रमक; VIDEO होतोय व्हायरल

Kavya Maran’s Aggressive Reaction to Vipraj Nigam’s RunOut in SRH vs DC : सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन तिच्या संघाची सर्वात मोठी समर्थक आहे. ती लिलावाच्या टेबलापासून ते हैदराबादच्या जवळजवळ प्रत्येक सामन्यात दिसते. सोमवारी राजीव गांधी स्टेडियमवर एसआरएच आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. या सामन्यातही, काव्या मारन स्टँडमध्ये बसून तिच्या संघाला पाठिंबा देत होती. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजी विप्राज निगम आऊट झाल्यानंतर, तिने जी रिअॅक्शन दिली ती चर्चेचा विषय ठरली आहे. कारण पहिल्यांदाच ती इतकी आक्रमक झालेली दिसली.
विप्राज निगम झाला रनआऊट –
खरंतर, झीशान अन्सारी दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १३ वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स स्ट्राईकवर होता. स्टब्स शॉट खेळल्यानंतर पहिल्या धावेसाठी धावला. यानंतर त्याचा साथीदार विप्राज दुसऱ्या धावेसाठी धावला पण स्टब्स त्याला नको म्हणत होता. मात्र विप्राज खाली मान खालून धावत असल्याने त्याला ते समजले नाही. अशा परिस्थितीत, दोन्ही फलंदाज एकाच टोकाला उभे राहिले. ज्यामुळे विप्राज रनआऊट झाला.
When the batters tell each other “Idhar chala, mein udhar chala” 🫣
Watch the LIVE action ➡ https://t.co/bgzzyyahDZ#IPLRace2Playoffs 👉 #SRHvDC | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/qc3f3uwP5v
— Star Sports (@StarSportsIndia) May 5, 2025
विप्राज रनआऊट झाल्यानंतर काव्याने वेधलं सर्वांच लक्ष –
Kavya Maran 😭😭😭😭 pic.twitter.com/bxoBd4Xnga
— Suheem. (@was_srhnation) May 5, 2025
विप्राज १८ धावा करून आऊट झाला. विप्राज निगमच्या रनआऊट होण्यावर काव्या मारनने भलतीच खूश दिसली. तिने या विकेटवर खूपच आक्रमक रिअॅक्शन दिली. यावेळी काव्या हावभावातून म्हणत होती की, दोन्ही फलंदाज एकाला बाजूला आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला थ्रो करा आणि अनिकेत वर्मानेही तेच केले. त्याने दुसऱ्या टोकाला थ्रो केला आणि विप्राद निगम रनआऊट झाला. यानंतर काव्या मारन टाळ्या वाजवताना दिसली. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘…म्हणून रोहित फिल्डिंग ऐवजी फक्त बॅटिंग करतोय’; हिटमॅनबद्दल कोच जयवर्धनेने केला खुलासा
दिल्लीने हैदराबादसमोर ठेवले १३४ धावांचे लक्ष्य –
THE PRICELESS REACTIONS OF KAVYA MARAN AT RUN OUT TIME. 😀❤️ pic.twitter.com/NeRv7ZH5eF
— Tanuj (@ImTanujSingh) May 5, 2025
दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून फलंदाजीला आल्यानंतर दिल्लीने २० षटकांत सात गडी गमावून १३३ धावा केल्या. त्यांच्याकडून ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी ४१-४१ धावांची खेळी केली. हैदराबादकडून पॅट कमिन्सने तीन तर जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि इशान मलिंगाने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





