पुणे – महिलांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या आरोग्याची सदैव काळजी घेणाऱ्या हेमंत रासने यांच्या पाठीशी कसबा मतदारसंघातील लाडक्या बहिणी भक्कमपणे उभ्या असल्याचा विश्वास भाजपच्या शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी व्यक्त केला.
हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ बापट, मृणालिनी रासने, ज्योत्स्ना सरदेशपांडे, ॲड. गायत्री खडके, योगिता गोगावले, रीना सपकाळ, माधुरी पंडित, रुपाली कदम, धनश्री कदम, श्रेया रासने, सोनाली सिद्ध आणि माधुरी मोधर या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रासने यांच्या प्रचारार्थ घरोघरी संपर्क साधून प्रचार करीत आहेत.
बापट म्हणाल्या, हेमंत रासने यांच्या पुढाकारातून कसबा मतदारसंघातील १२ हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला प्रत्येकी १५०० रुपये जमा होत आहेत. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी महायुती सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. एसटी बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत असून, मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यात हेमंत रासने आघाडीवर आहेत.
कसबा मतदारसंघात अनोखी तयारी; विधानसभेच्या मतदानावेळी महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
याशिवाय स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यांचे कार्य हेमंत रासने पुढे नेत आहेत. स्त्री शक्ती गौरव पुरस्कार दरवर्षी २० हजार महिलांचे हळदी- कुंकू, रक्षाबंधन, कन्यापूजन, महाभोंडला आरोग्य तपासणी, लहान मुलांच्या ह्दय शस्त्रक्रिया, कॅन्सर रुग्णांना पेट स्कॅन व केमोथेरपी, श्रवण यंत्रांचे वाटप, रक्त तपासण्यांचा लाभ हजारो महिलांनी घेतला असल्याचे बापट यांनी या वेळी स्पष्ट केले.