‘Kasaba Award’: पाच मान्यवरांना ‘कसबा पुरस्कार’ प्रदान
'Kasaba Award':

‘Kasaba Award’: ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. १५) कसबा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल केपीआयटी उद्योग समूहाचे प्रमुख किशोर पाटील, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिनेकलावंत प्रवीण तरडे, आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल स्वामी मकरंद नाथ, आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. गणेश राख यांचा कसबा पुरस्काराने, तसेच विधी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भाऊसाहेब निरगुडकर पुरस्काराने ॲड. पी. नारायण यांचा यांचा गौरव करण्यात आला.
श्री कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रेडिओ सिटीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला.
भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधणाऱ्या गणेशोत्सवात कर्तृत्वाचा गौरव करण्याची परंपरा जपली जात आहे, याचे कौतुक आहे, असे सांगून. मूलधारोस्थीतोसी नित्यम या सूत्राची महती डाॅ. देगलूरकर यांनी विशद केली. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पुरस्कारामागील भूमिका सांगितली. तरडे, डाॅ. राख आणि पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.





