Kartiki Wari 2021: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा
Updated On:

सोलापूर – करोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची कार्तिकी यात्रा पार पडत आहे. या कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी पहाटे दोन वाजता होणार आहे.
यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे, मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, नगराध्यक्ष तथा मंदिर समिती सदस्या साधना भोसले यांच्यासह सर्व सदस्य, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुलदवाड यांच्या उपस्थितीत होणार आहे. या महापुजेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कोणती घोषणा करणार याकडे विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे.





