Pune District : दिलीप बारभाई यांना सोबत घेऊनच लढा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेजुरीत कार्यकर्त्यांना निर्देश

जवळार्जुन : जेजुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काळात ज्येष्ठ नेते दिलीप (दादा) बारभाई यांना सोबत घेऊनच लढवायच्या आहेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले.
अजित पवार हे सोमेश्वर साखर कारखान्याची सभा आटोपून जेजुरी येथे आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई यांच्या नेतृत्वात संघटितपणे लढण्याचे आवाहन केले. अजित पवार म्हणाले की, जेजुरीतील सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिलीप बारभाई यांच्या सल्ल्यानुसार एकजुटीने काम करावे. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच निवडणूक लढवावी. या बैठकीदरम्यान माजी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप यांनीही अजित पवार यांच्या सूचनांबाबत माहिती दिली.
बैठकीला माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रमेश लेंडे, शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष रमेश बयास, मुकुंद बेलसरे, माजी नगरसेवक भारत शेरे, एन. डी. जगताप, हरिभाऊ बोधले, गणेश मुंडलिक, योगेश जगताप, सुशिल राऊत, संजय शेवाळे, माजी नगराध्यक्षा साधना दिडभाई, दिलीप दोडके, सनी झगडे, शिवाजी जगताप, मयुरेश लेंडे, माधव बारभाई, बाळासाहेब गोसावी, शेखर बारभाई, प्रशांत लाखे, समीर मुलाणी, विजय खोमणे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व बारा बलुतेदार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळणार असून, पक्षात संघटनबांधणीला चालना मिळेल, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जेजुरी ः कार्यकर्त्यांशी चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.





