Sushma Andhare Post : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या एक्स पोस्टवरून सतत चर्चेच असतात. राज्यातील अनेक विषयांवर त्या पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत असतात. त्यांच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. आता नुकतीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या एक्स पोस्टवर सुषमा अंधारे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री आशिष शेलार यांनी एक्स पोस्टवर विरोधीपक्ष एकत्र होतात, तेव्हा राजा इमानदार असतो, असे ट्वीट केले होते. या ट्वीटचा सुषमा अंधारे यांनी खरपुस समाचार घेतला आहे. “जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा इमानदार है” असे आचार्य चाणक्य यांचे वाक्य आशिष शेलार यांनी ट्वीट केले होते. या एका वाक्यात आता राजकीय अर्थ नेटकऱ्यांनी काढला आहे. तुमच्या फाजील आत्मविश्वासाला खरच दाद दिली पाहिजे. गेल्या पाच दहा वर्षात ज्यांच्या ज्यांच्यावर HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याने खून, बलात्कार, दरोडे भ्रष्टाचार ईडीग्रस्त, घोटाळेबाज , चक्कीपिसिंग, देशद्रोही असे आरोप लावले ते सगळे आजघडीला तुमच्या वळचणी ला आहेत. याला तुमच्या… https://t.co/Ot6fgjgRSE pic.twitter.com/04tJa9eGax — SushmaTai Andhare (@andharesushama) October 15, 2025 आता यावर ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी आशिष शेलार यांचे ट्वीट रिशेअर करत एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल पटेल असे विरोधी पक्षातून आलेले आणि युतीमधील नेते आसनस्थ झालेले दिसत आहेत. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला पिवळे तर इतर नेत्यांना लाल वर्तुळे ओढलेली दिसत आहे. सुषमा अंधारे काय म्हणाल्या? तुमच्या फाजील आत्मविश्वासाला खरच दाद दिली पाहिजे. गेल्या पाच दहा वर्षात ज्यांच्या ज्यांच्यावर HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याने खून, बलात्कार, दरोडे भ्रष्टाचार ईडीग्रस्त, घोटाळेबाज, चक्कीपिसिंग, देशद्रोही असे आरोप लावले ते सगळे आजघडीला तुमच्या वळचणीला आहेत. याला तुमच्या भाषेत इमानदारी म्हणतात का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना केला आहे. उठा जागे व्हा.. आरशात स्वतःकडे बघून स्वतःशी प्रामाणिक उत्तरे शोधा ..! # असेही पुढे अंधारेंनी म्हटले आहे. हेही वाचा : “भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही’, पंतप्रधान मोदींनी आम्हाला आश्वासन दिलं” ; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा