Karnataka Election : ‘भाजपचा अंतकाळ सुरू झाला आहे…’; अखिलेश यादव यांची जहरी टीका
Updated On:

लखनौ – कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयावर प्रतिक्रीया देताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की “या निकालामुळे भाजपचा अंतकाळ आता सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत’. भाजपची नकारात्मक, भ्रष्टाचारी, जातीयवादी आणि श्रीमंताभिमुख राजनिती लोकांना पसंत नाही. त्याचेच त्यांना आता फळ मिळणार आहे असे ते म्हणाले.
कर्नाटकचा निकाल म्हणजे नव्या भारताचा सकरात्मक कौल असून बेरोजगारी,भ्रष्टाचार, आणि महागाईच्या विरोधात जनतेने दिलेला हा स्पष्ट कौल आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान उत्तरप्रदेशातून कॉंग्रेसच्या विजयाच्या सकारात्मक प्रतिक्रीया विरोधी गोटातून व्यक्त होत असून त्यात दक्षिण भारत भाजप मुक्त झाल्याची बाबही नमूद केली जात आहे.





