Congress Leader : दुःखद बातमी..! कॅबिनेट मंत्र्यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा
Congress Leader : कर्नाटकचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे बंगळुरू येथे निधन झाले आहे.

Congress Leader : कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. कर्नाटक सरकारमधील नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. (Congress Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, डी. सुधाकर यांच्यावर बंगळुरूतील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (KIMS) रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. (Congress Leader)
डी. सुधाकर हे कर्नाटक काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि निष्ठावान नेते म्हणून ओळखले जात होते. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर विधानसभा मतदारसंघातून ते अनेकदा आमदार म्हणून निवडून आले होते. आपल्या साध्या स्वभावामुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संवादामुळे ते राज्यभर लोकप्रिय होते. (Congress Leader)
राजकारणात त्यांनी सामाजिक कल्याण, युवा कल्याण आणि नियोजन-सांख्यिकी यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. प्रशासनातील अनुभव आणि जनतेसाठी काम करण्याची तळमळ यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. (Congress Leader)
त्यांच्या निधनानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “सुधाकर हे माझे जवळचे सहकारी होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे आणि राज्याचे मोठे नुकसान झाले आहे,” अशा शब्दांत नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डी. सुधाकर यांच्या निधनामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Congress Leader)





