PM Modi: “काँग्रेसने डीएमकेचा विश्वासघात केला” ; तामिळनाडूमध्ये TVK ला पाठिंबा दिल्यानंतर मोदींचा जोरदार हल्ला
PM Modi: टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.

PM Modi: टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. १९६७ नंतर द्रमुक आणि एआयएडीएमके आघाडीबाहेर राहून तामिळनाडू सरकारचे नेतृत्व करणारे ते पहिले नेते ठरले आहेत. मात्र, हे सोपे नव्हते, कारण सरकार स्थापन करण्यासाठी ‘थलपथी’ यांना एकाच आठवड्यात राज्यपालांना चार वेळा भेटावे लागले.
विधानसभा निवडणुकीत टीव्हीके राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी, सरकार चालवण्यासाठी त्यांना काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह लहान पक्षांवर अवलंबून राहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील या आघाडी सरकारबाबत एक निवेदन जारी केले आहे.
VIDEO | Bengaluru, Karnataka: PM Modi(@narendramodi), addressing a public meeting, said, “Today, the Congress has earned the image of a parasitic party. And that is why, at the very first opportunity, it betrays even its allies… Just look at Tamil Nadu. For 25–30 years,… pic.twitter.com/dxHfsRhrKu
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2026
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला परजीवी पक्ष म्हटले. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर महाआघाडीत आपला दीर्घकाळचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुकचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. कर्नाटकातील बंगळूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी,”आज काँग्रेसची ओळख एक परजीवी पक्ष म्हणून झाली आहे आणि म्हणूनच संधी मिळताच तो आपल्या मित्रपक्षांनाही दगा देतो. तामिळनाडूकडेच बघा.”
डीएमकेमुळे यूपीए सरकार अनेकदा टिकले PM Modi:
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला परजीवी पक्ष संबोधत त्यावर टीका केली. ते म्हणाले की, २५-३० वर्षे काँग्रेस आणि डीएमकेचे जवळचे संबंध होते. डीएमकेसोबतच्या युतीने काँग्रेसला अनेक वेळा संकटातून वाचवले आणि २०१४ पूर्वी १० वर्षे सत्तेवर असलेले यूपीए सरकारसुद्धा डीएमकेमुळेच टिकले.
काँग्रेसला सत्तेची भूक PM Modi:
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, डीएमके २५-३० वर्षे काँग्रेसच्या सुख-दुःखात सोबत उभी राहिली. प्रत्येक क्षणी ते काँग्रेसच्या हिताचेच होते, पण इतरत्र राजकीय समीकरणे बदलताच, सत्तालोभी काँग्रेसने पहिल्याच संधीत डीएमकेला दगा दिला.





