Umbraj News : पेरले गावाच्या हद्दीत गोळीबारात एक जखमी
Umbraj News : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भीषण गुन्हेगारी घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Umbraj News : कराड तालुक्यातील उंब्रजनजीकच्या इंदोली फाट्याजवळ पेरले गावच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मित्रांमधील वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत एकाला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. (Umbraj News)
जखमीवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही मित्रांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर यातील एकाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. (Umbraj News)
यावेळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती असून एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पाटण विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरे, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Umbraj News)
गोळीबारामागील नेमके कारण, घटनेत सहभागी व्यक्तींची संख्या आणि हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. (Umbraj News)





