Karad Crime : लग्न समारंभासाठी निघालेल्या तांबवे (ता. कराड) येथील एका महिलेचे तब्बल ११ तोळे सोने कराड बसस्थानक परिसरातून चोरीस गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी, दि. २२ सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर संबंधित महिलेने कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. (Karad Crime) संबंधित महिलेचे नाव रेखा चव्हाण असे असल्याची प्राथमिक माहिती आहे. कराडहून पंढरपूरला लग्न समारंभासाठी ही महिला एसटीतून जाण्यासाठी बस स्थानक परिसरात आली होती. (Karad Crime) यावेळी गर्दीचा फायदा घेत संशयितांनी सोन्याचे दागिने लंपास केले. गर्दीत हा प्रकार लक्षात न आल्याने महिला एसटीमध्ये बसल्यानंतरच तिने बॅग तपासली असता दागिने ठेवलेली पर्स गायब असल्याचे लक्षात आले. (Karad Crime) त्यानंतर तिने तात्काळ कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बस स्थानक परिसरात चौकशी करत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Karad Crime)