Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड म्हणून ओळखले जाणारे आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) याची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना समोर आली आहे. त्याला तातडीने उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर (Walmik Karad) वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Walmik Karad) वाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. तुरुंगात असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. Walmik Karad walmik karad रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली असून, विविध वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी याच हत्येप्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला त्याच्या भावाच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी एक दिवसासाठी कारागृहाबाहेर पाठवण्यात आले होते. प्रकरणाची पार्श्वभूमी (Walmik Karad) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या या प्रकरणाला आता दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. हे प्रकरण सध्या बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुनावणीसाठी न्यायप्रविष्ठ आहे. या खटल्यातील सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत. यातील विष्णू चाटे हा लातूर कारागृहात तर उर्वरित आरोपी बीड जिल्हा कारागृहात बंदिस्त आहेत. मुख्य आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) याची प्रकृती बिघडल्याची ही घटना घडली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून वाल्मीक कराडच्या चाचण्या सुरू असून, त्यानंतरच त्याला नेमके काय झाले याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. रुग्णालयात त्याच्यावर सतत देखरेख आणि उपचार सुरू आहेत.