Stokes Sacked Nightclub : इंग्लंड क्रिकेटला मोठा कलंक! नाईटक्लब हाणामारीच्या तपासानंतर स्टोक्सचे करिअर धोक्यात; ‘या’ दिग्गजाकडे सोपवली कॅप्टन्सी
Stokes Sacked Nightclub : लॉर्ड्स येथील पहिला सामना संपल्यानंतर झालेल्या एका लाजिरवाण्या 'नाईट क्लब' वादामुळे इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि पहिल्या सामन्यात चमकलेला वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन या दोघांना संघातून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे

Stokes Sacked Nightclub ENG vs NZ 2nd Test Joe Root Captain : ईसीबीने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेसोबतच इंग्लंड क्रिकेटमध्ये एक मोठा भूकंप झाला आहे. लॉर्ड्स येथील पहिला सामना संपल्यानंतर झालेल्या एका लाजिरवाण्या ‘नाईट क्लब’ वादामुळे इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि पहिल्या सामन्यात चमकलेला वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन या दोघांना संघातून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. आता संघाची धुरा अनुभवी खेळाडू जो रूट याच्याकडे कार्यवाहक कर्णधार म्हणून सोपवण्यात आली आहे.
नाईट क्लबमधील हाणामारी; बेन स्टोक्सचे करिअर धोक्यात?
७ जून रोजी लॉर्ड्स कसोटी लवकर संपल्यानंतर बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन हे लंडनमधील चेल्सी येथील एका नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथे मध्यरात्री झालेल्या एका हाणामारीच्या घटनेत हे दोन्ही खेळाडू सामील असल्याचे समोर आले आहे. ईसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संघ शिस्त आणि कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही खेळाडूंची चौकशी सुरू केली आहे. या वादामुळे बेन स्टोक्सच्या कर्णधारपदासह त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर ‘फुल स्टॉप’ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जोफ्रा आर्चरची वापसी; जॉर्डन कॉक्सला संधी –
🚨 𝗕𝗜𝗚 𝗕𝗥𝗘𝗔𝗞𝗜𝗡𝗚
Ben Stokes and Gus Atkinson have been DROPPED from the Test squad of 🏴 ❌
The England captain along with the fast bowler was spotted at a nightclub where an incident happened reportedly, and England and Wales Cricket Board has taken a big step ⚠️… pic.twitter.com/PLCkCLXw07
— Cricketangon (@cricketangon) June 10, 2026
१७ जूनपासून लंडनच्या केनिंग्टन ओवल मैदानावर सुरू होणाऱ्या या दुसऱ्या कसोटीत स्टोक्स आणि अॅटकिन्सनच्या जागी संघात मोठे बदल झाले आहेत. स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ११ जून रोजी आयपीएल संपवून मायदेशी परतणार असून, अॅशेस मालिकेनंतर पहिल्यांदाच त्याची कसोटी संघात वापसी झाली आहे. त्याच्यासोबतच जॉर्डन कॉक्सला संघात स्थान मिळाले आहे. मात्र, आर्चरच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे तो अंतिम अकरामध्ये खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. नव्या कर्णधारपदाबाबत बोलायचे झाल्यास, जो रूटने २०१७ ते २०२४ या काळात इंग्लंडसाठी विक्रमी ६४ कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा अधिकृत संघ:
जो रूट (कप्तान), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, शोएब बशीर, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेम्स रियू, ओली रॉबिन्सन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जोश टंग.





