Success Story : लेकी मानलं तुला! आईच्या कष्टाचं चीज केलंस; कांचनने MPSC मध्ये मिळवला २३वा क्रमांक
Success Story : शेतात मोलमजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज करत कांचन महाजन यांनी MPSC परीक्षेत २३वा क्रमांक पटकावून राज्य कर निरीक्षक (STI) पद मिळवले आहे.

Success Story : आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात कष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या आईच्या त्यागाला अखेर यशाची सोन्याची किनार लाभली. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने केलेल्या अथक संघर्षाला जिद्द आणि मेहनतीची जोड देत कांचन जयंत महाजन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. ओबीसी प्रवर्गातून २३वा क्रमांक मिळवत त्यांची राज्य कर निरीक्षक (STI) पदावर निवड झाली आहे. (Success Story)
कांचन यांच्या यशाची बातमी समोर येताच कुटुंबीय आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, हे यश केवळ कांचनचे नसून वर्षानुवर्षे शेतात राबलेल्या त्यांच्या आईच्या संघर्षाचाही विजय मानला जात आहे. (Success Story)
वडिलांचे छत्र हरपले, आईने संसाराचा गाडा हाकला
कांचन यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्या लहान होत्या. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई हेमलता महाजन यांच्या खांद्यावर आली. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले. (Success Story)
उन्हाची, पावसाची पर्वा न करता त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी केली. स्वतःच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, हा त्यांचा ध्यास होता. (Success Story)
आईच्या घामाला लेकीच्या जिद्दीची साथ
आईने परिस्थितीशी संघर्ष करत कांचन यांच्या शिक्षणासाठी आधार दिला. कांचन यांनीही आईच्या कष्टांची जाणीव ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. आर्थिक अडचणी आणि अनेक प्रतिकूल परिस्थितींवर मात करत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर MPSCच्या अंतिम निकालात २३वा क्रमांक पटकावला. (Success Story)
“माझं यश आईच्या शेतातील घामातून आलं”
आपल्या यशाबद्दल कांचन महाजन यांनी व्यक्त केलेले शब्द मनाला भिडणारे आहेत. “माझे हे यश कोणत्याही पुस्तकातून किंवा क्लासमधून आलेले नाही, तर ते माझ्या आईच्या शेतातील घामातून आले आहे. तिने माझ्यासाठी स्वतःची स्वप्ने मारली. आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तिच्या त्यागामुळे आहे.” कांचन यांनी सांगितले की, त्यांच्या भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठीही आईने मोठे कष्ट घेतले. आईने दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य झोकून दिले. (Success Story)
![]()
तरुणांसाठी कांचनचा प्रेरणादायी संदेश
यशानंतर कांचन यांनी युवक-युवतींना आपल्या स्वप्नांवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. नैराश्यात न जाता उपलब्ध संधी ओळखून जिद्दीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. (Success Story)
शेतमजूर आईचा संघर्ष आणि तिच्या लेकीची जिद्द यांचा हा विजय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कांचनच्या यशामुळे आईच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू हेच तिच्या वर्षानुवर्षांच्या कष्टाचे खरं चीज ठरलं आहे. (Success Story)





