कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरण: अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ताब्यात
Updated On:

पुणे – पुण्यातील कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन चालकाच्या आईला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या दोन जणांना धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला.
या गुन्ह्यात अल्पवयीन चालकाचे वडील विशाल आणि आजोबा सुरेंद्र यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता मुलाच्या आईलाही ताब्यात घेण्यात आले आहे. शिवानी अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
आज दुपारी शिवानी अग्रवाल यांंना पोलीस न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.





