Kalki 2898 : ‘कल्कि 2898 AD’ च्या सिक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर, खरं कारणं आल समोर!

Kalki 2898 : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला ‘कल्कि 2898 AD’ या बहुचर्चित चित्रपटाच्या सिक्वलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत दीपिका आता या प्रोजेक्टचा भाग नसल्याचं जाहीर केलं.
सुरुवातीला तिच्या जास्त मोबदल्याच्या मागण्या आणि वर्क कमिटमेंट्समुळे ती चित्रपटातून बाहेर गेल्याची चर्चा होती. मात्र, एका अहवालानुसार खरी परिस्थिती काही वेगळीच आहे.
आधी होतं वेगळं प्लानिंग
सिक्वलच्या कथानकात दीपिकाच्या ‘सम 80’ या भूमिकेला महत्त्व देण्यात आलं होतं. ती पात्रं सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहणार होती. मात्र नंतर मेकर्सनी स्क्रिप्टमध्ये बदल करत तिचा रोल कमी केला. हे दीपिकाला पसंत पडलं नाही.
मेकर्सचा निर्णय आणि दीपिकेची नाराजी
या बदलामुळे दीपिका आणि तिच्या टीमला मोठा धक्का बसला. अखेरीस दीपिकानेच चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मेकर्सनी अधिकृत निवेदन जारी करत म्हटलं, “दीपिका पादुकोण ‘कल्कि 2898 AD’ च्या सिक्वलमध्ये दिसणार नाही. बराच विचार करून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या चित्रपटात दीर्घ काळ काम केलं, पण सिक्वलमध्ये भागीदारी शक्य झाली नाही.”
चाहत्यांमध्ये निराशा
या घोषणेनंतर दीपिकाच्या चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. पहिल्या भागात तिच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं, त्यामुळे ती सिक्वलमध्ये दिसणार नाही याचं वाईट वाटत आहे.





