Deepika Padukone | Ranveer Singh : दसऱ्याच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरच चाहत्यांना खास सरप्राइज.! जाहीर केलं दुसऱ्या लेकीचं नाव; फोटोत दिसली गोड झलक
दोन्ही नावांची सुरुवात ‘D’ या इंग्रजी अक्षराने होते. ‘देवी पादुकोण सिंह’ या नावात दीपिका आणि रणवीर या दोघांच्याही आडनावांचा समावेश आहे.

Deepika Padukone | Ranveer Singh : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. तेव्हापासून या लाडक्या लेकीची पहिली झलक कधी पाहायला मिळणार, तिचं नाव काय असणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या जोडप्याने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे.
दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या दुसऱ्या लेकीचं नाव जाहीर करत तिची पहिली झलकही सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘देवी पादुकोण सिंह’ असं या चिमुकलीचं नाव असून, या घोषणेमुळे चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे.
विशेष म्हणजे, या खास कौटुंबिक फोटोमध्ये मोठी मुलगी दुआ आपल्या धाकट्या बहिणीला प्रेमाने किस करताना दिसत आहे. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि दोन्ही लेकींसोबतचा हा गोड क्षण पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दीपिका पादुकोणने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर रणवीर सिंहसोबतचा एक खास कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर आपल्या दोन्ही मुलींसोबत दिसत आहेत.
या जोडप्याने धाकट्या लेकीचं नाव ‘देवी पादुकोण सिंह’ असं जाहीर केलं आहे. फोटोसोबत त्यांनी ‘Of Love & Abundance…’ असं लिहित आपल्या आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दुसऱ्या लेकीच्या नावाने वेधलं लक्ष
दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या नावांमध्ये एक खास साम्य ठेवलं आहे. त्यांच्या पहिल्या मुलीचं नाव ‘दुआ’, तर दुसऱ्या मुलीचं नाव ‘देवी’ असं आहे. दोन्ही नावांची सुरुवात ‘D’ या इंग्रजी अक्षराने होते. ‘देवी पादुकोण सिंह’ या नावात दीपिका आणि रणवीर या दोघांच्याही आडनावांचा समावेश आहे.
२०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले….
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांची ओळख आणि प्रेमकहाणी चित्रपटांच्या सेटवर सुरू झाली होती. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पडद्यावरील या जोडीने वास्तविक आयुष्यातही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.






