‘कल्की 2898 एडी’ चित्रपट ओटीटीवर येण्यास होणार सज्ज

Kalki 2898 AD OTT Release| अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन स्टारर चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ 27 जून रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘कल्की 2898 एडी’ने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसात 500 कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटातील कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. एकीकडे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरू असताना आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज होणार आहे. कल्की 2898 एडी हा चित्रपट जुलैच्या अखेरीसपर्यंत ओटीटी रिलीज करण्याचे नियोजन होते.
मात्र, चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता हा चित्रपट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनवर या चित्रपटाचे स्ट्रीमिंग सुरू केले जाऊ शकते. Kalki 2898 AD OTT Release|
‘कल्की 2898 एडी’ने मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड
दरम्यान, प्रभासच्या या चित्रपटाने रिलीजच्या 11व्या दिवशी आतापर्यंत 36.72 कोटींची कमाई केली आहे. तर 11व्या दिवशी ‘पठाण’ची कमाई 23.25 कोटी रुपये होती. त्यामुळे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाचे देखील ‘कल्की 2898 एडी’ने रेकॉर्ड मोडला आहे. Kalki 2898 AD OTT Release|
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, ब्रह्मानंदम, राणा डग्गुबती, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली सी अश्विनी दत्त या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा:





