अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते म्हणतात ‘बीवी हो तो ऐसी’ लाखोंचा बनारसी सूट घातलेल्या काजल अग्रवालचे फोटो Viral

मुंबई – काजल अग्रवालने पती गौतम किचलूच्या वाढदिवसानिमित्त काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा ईथरीयल बनारसी पोशाख तिच्यावर खूप अप्रतिम दिसत आहे. गुलाबी रंगाचे डिझायनर कट स्लीप स्टाईल आणि सलवारमध्ये काजल खूपच सुंदर दिसत आहे.पतीसोबतच्या या फोटोंवर चाहत्यांनी काजलला अनेक सॅले दिल्याचे पाहायला मिळत आहे.

काजल अग्रवालचे साऊथ इंडस्ट्रीसह हिंदीमध्ये देखील खूप चाहते आहेत. हँड एम्ब्रॉयडरी केलेला बनारसी शरारा स्टायलिश ड्रेस काजलला खूपच सूट झाल्याचे पाहायला मिळते. पतीच्या वाढदिवसानिमित्त काजलसाठी हा ड्रेस डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाइन केल्याचे समजते. ओढीनीसह संपूर्ण क्लासिक डिझाईन असलेला हा ड्रेस चाहत्यांना देखील प्रचंड आवडल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार या ड्रेसची किंमत 1 लाख 20 हजार असल्याचे समजते.

या ड्रेसवर काजल अग्रवालने मोठे कानातले आणि मोकळे केस घालून नॅचरल लूकमध्ये दिलेली पोझ चाहत्यांना भुरळ घालत आहे. अनेकांनी तर ‘बीबी हो तो ऐसी’ अशा कमेंट देखील केल्या आहेत. ‘मगधीरा’ आणि ‘मेर्सल’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेल्या काजल अग्रवालने 2020 मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले होते.





